leopard attack on ship 10 ship dead in rajapur ratnagiri 
कोकण

नोकरी गेली म्हणून शेळ्या पाळल्या ; बिबट्याने मात्र गोठ्यात घुसून त्यांचा फडश्या पाडला

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : तालुक्‍याच्या पूर्व परिसरातील करक गावात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी पहाटे शेळ्यांच्या गोठ्यात घुसलेल्या बिबट्याने दहा शेळ्यांना भक्ष्य केले असून, दोन शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर करक गावात प्रचंड घबराट पसरली आहे.

करक-गांगणवाडी येथील भालचंद्र चंद्रकांत गांगण यांच्या मालकीच्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. कोरोनाच्या महामारीमुळे नोकरी गमवावी लागलेल्या भालचंद्र गांगण यांनी आपल्या करक गावी येऊन शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता. सुमारे वीस ते पंचवीस शेळ्या त्यांनी खरेदी केल्या होत्या.
भालचंद्र गांगण यांच्या घराच्या बाजूलाच शेळ्यांचा गोठा असून बुधवारी पहाटे शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून गांगण तत्काळ उठले व गोठ्यात गेले असता आत सर्व अस्ताव्यस्त दिसले. शेळ्या कमी दिसल्या. त्यामध्ये काही शेळ्या मरून पडल्या होत्या. काही जखमी अवस्थेत होत्या तर काहींची धडपड सुरू होती. गोठ्याबाहेर दूरवरही मृतावस्थेत शेळ्या पडल्या होत्या. 

गांगण यांची आरडाओरड ऐकून झोपेतून जागे झालेले आजूबाजूचे लोक धावून आले. त्यांनी पळून जाणाऱ्या बिबट्याला पाहिले. गोठ्यात असलेल्या काही शेळ्या बिबट्याने ओढत बाहेर नेऊन त्यांना ठार केले होते. त्यांची अवस्था भयानक होती. काही शेळ्यांचे लचके तोडण्यात आले होते. काहींच्या मानाच बिबट्याने खाल्ल्या होत्या. गोठ्यात रक्ताचा सडा पडला होता. 

बिबट्याच्या तडाख्यातून वाचलेल्या शेळ्या गंभीर जखमी झाल्या होत्या. दरम्यान, बिबट्या गोठ्यातून पळून गेला होता. या घटनेनंतर भालचंद्र गांगण यांनी गावचे पोलिसपाटील महेंद्र गांगण यांच्यासह माजी सरपंच विलास नारकर यांना झाल्या प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर राजापूरचे वनाधिकारी घाडगे यांना माहिती देण्यात आली.

सव्वा लाखाचे नुकसान

ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. मृत शेळ्या गोठ्याबाहेर आणून ठेवल्या. जखमी शेळ्या तडफडत होत्या. वनविभागाचे अधिकारी कार्यालयीन कामकाजासाठी रत्नागिरीला होते. करकमधील घटनेची माहिती मिळताच ते दुपारी करकमध्ये दाखल झाले. बिबट्याच्या हल्ल्यात दहा शेळ्या ठार झाल्या. मालक भालचंद्र गांगण यांचे सुमारे लाख ते सव्वा लाखाचे नुकसान झाले असून, दोन शेळ्या जखमी आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT