नाशिक - सामाजिक कार्याची दखल घेऊन येथील सुयोग सुरेश जोशी फाऊंडेशनतर्फे नीलम राणे यांना महाराष्ट्राची दुर्गा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नाशिक - सामाजिक कार्याची दखल घेऊन येथील सुयोग सुरेश जोशी फाऊंडेशनतर्फे नीलम राणे यांना महाराष्ट्राची दुर्गा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 
कोकण

नीलम राणे यांना महाराष्ट्राची दुर्गा पुरस्कार

सकाळवृत्तसेवा

तळेरे - वैभववाडी तालुक्‍यातील कोकिसरे येथील नीलम राणे यांना महाराष्ट्राची दुर्गा हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून विविध माध्यमातून करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन नाशिक येथील सुयोग सुरेश जोशी फाऊंडेशनने त्यांना हा पुरस्कार देऊन गौरव केला. 

सुयोग सुरेश जोशी फाऊंडेशनकडून ज्योतीने तेजाची आरती या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या 19 रणरागिणींचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सागळे, नगरसेविका वत्सला खैरे, फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष देवरे, संचालिका अनुश्री अवधूत, भरत गोसावी आदी उपस्थित होते.

नीलम राणे ह्या रात्री अपरात्री अनेकांच्या अडचणीत मदत करायला तत्पर असतात. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्या सांताक्रूझ कलिना परिसरात राणेकाकी या नावाने ओळखल्या जातात. त्या सांताक्रूझ कलिना येथे गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. त्याठिकाणी त्या आठ बचत गट चालवत असून त्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्राची दुर्गा हा पुरस्कार म्हणून सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. त्या सिंधुदुर्ग सुपुत्र आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू जयेश राणे यांच्या मातोश्री आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT