Maharashtra Politics Uday Samant Join Eknath Shinde in Guwahati ratnagiri sakal
कोकण

मंत्री उदय सामंत गुवाहटीत, जिल्ह्यात खळबळ

रत्नागिरीचाही बुरूज ढासळला ; पाठिराख्यांची सावध भूमिका

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी एक बुरूज ढासळला. मोठा धक्का म्हणजे हा बुरूज रत्नागिरीचा. कोकणातील शिवसेनेचे प्रमुख नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे आज नॉट रिचेबल झाले. त्यांच्याशी आणि निकटवर्तीयांशी दुरध्वनीवरुन संपर्कही साधण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. सामंत सायंकाळी गुवाहाटीला दाखल झाल्यावर त्यांनी एकनाथ शिंदेंची गळाभेट घेतली. त्यामुळे ते शिंदे यांच्या गोटात सामील झाल्यावर शिक्कामोर्तब झाले. मंत्री उदय सामंत गेली दोन दिवस रत्नागिरीतील पाली येथे त्यांच्या निवास्थानी होते. त्यांनी दिवसभर पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी सल्लामसलत केली. कुटुंबीयांशीही चर्चा केली होती.

या चर्चेतील प्रतिसादाचा अंदाज घेऊन सामंत लवकरच भावी राजकीय दिशा ठरवतील, असा अंदाज मांडला जात होता. पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू समजून घेण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे सामंत नक्की कुठे जाणार याबाबत तर्कवितर्क मांडले जात होते. त्यानंतर ते शनिवारी (ता. २५) मुंबईत मातोश्रीवर झालेल्या बैठकीलाही उपस्थित राहिले होते. त्यामुळे सामंत शिंदे गटात जाणार नाहीत, अशी खात्री त्यांनी पाठीराख्यांना दिली. आज दुपारी सोशल मीडियावर सामंत गुवाहटीला रवाना झाल्याच्या पोस्ट पडल्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप झाला. सामंत गुवाहाटीला रवाना झाल्याच्या चर्चेने अनेक कार्यकर्त्यांना धक्का बसला. जिल्ह्यात चर्चांना उधाण आले. ते सुरत मार्गे रवाना झाल्याचीही चर्चा रंगली होती. त्यांचा आणि निकटवर्तीयांचा दूरध्वनी लागत नसल्यामुळे त्याला पुष्टी मिळत होती; परंतु ते शिंदे गटाला सामील झाल्याचे अधिकृत वृत्त आलेले नाही.

मात्र एका विमानाचे तिकिटही सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामध्ये उदय सामंत यांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. सुरत विमानतळाहून ते गुवाहाटीला रवाना झाल्याचेही फोटो व्हायरल झाले आहेत. सायंकाळी सामंत गुवाहाटीत दाखल होऊन त्यांनी एकनाथ शिंदे यांची गळाभेट घेतल्याने तेही शिंदेंच्या गोटात गेल्याचे निश्चित झाले.

जिल्ह्यातील शिवसेनेचे चार आमदार असून एक मजबूत पक्षसंघटन आहे. राज्यात उलथापालथ झाली तरी जिल्ह्यात सेनेचा गड अभेद्य राहील असे म्हटले जात होते. मात्र दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या रूपाने पहिला बुरूज ढासळला. ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाले. उदय सामंत यांच्याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. मात्र आज ते देखील शिंदे गटात सामील झाल्याच्या चर्चेने जिल्ह्यात सेनेला दुसरा मोठा धक्का बसला. या सर्व घडामोडीमुळे उदय सामंत यांच्या रत्नागिरीतील संपर्क कार्यालयात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलो होता.

उदय सामंत गुवाहाटीला रवाना झाल्याचे सोशल मीडियावरून आमच्या समोर आले आहे. त्याच्याशी संपर्क झालेला नाही. परंतु स्थानिक आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील भूमिका स्पष्ट करू.

--विलास चाळके, शिवसेना, जिल्हाप्रमुख

शिंदे गटात सामिल होण्याबाबत माहित नाही

उदय रत्नागिरीत आल्यानंतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्याची चर्चा सुरू होती. एकुणच तांत्रिक गोष्टीचा विचार सुरू होता. मात्र एकनाथ शिंदे गटात सामिल होण्याबाबत कोणाताही निर्णय आम्हाला माहित नाही. वृत्तवाहिन्यांच्या बातम्या पाहिल्यानंतर आम्हाला ही घडामोड समजली, इशी प्रतिक्रिया वडील आणि ज्येष्ठ उद्योजक रवींद्र उर्फ अण्णा सामंत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT