Maharashtra ST Workers Union President Sandeep Shinde and General Secretary Hanumant Tate  Demand  the statement to the Chief Minister Finance Minister and Transport Minister
Maharashtra ST Workers Union President Sandeep Shinde and General Secretary Hanumant Tate Demand the statement to the Chief Minister Finance Minister and Transport Minister 
कोकण

संदीप शिंदे ; सर्वांचे पगार वेळेवर होतील जर शासनाने ....

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : कोरोना महामारीच्या काळात एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांना वेतन देणे कठीण झाले आहे. परंतु शासनाकडून दोन हजार कोटी रुपये मिळाल्यास सर्वांचे पगार वेळेवर होतील. याकरिता दरमहा 400 कोटी रुपये एसटीकडे वर्ग करावेत, अशी मागणी एकमेव मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्री व परिवहन मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजितदादा पवार, परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार शरद पवार यांना पाठवण्यात आले आहे. यासंदर्भात शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार एस. टी. महामंडळाची वाहतूक सुरू असली तरीही महामंडळाचे दररोज 23 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांचे वेतन व डिझेल खर्चही भागविणे कठीण झाले आहे.


राज्य शासनाने आतापर्यंत महामंडळाला देय होणार्‍या सवलत मूल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी 870 कोटी रुपये इतकी रक्कम दिली. त्यामुळे कर्मचार्‍यांना मार्चचे 75 टक्के, एप्रिलचे 100 टक्के व मे महिन्याचे 50 टक्के वेतन मिळाले. प्रवासी वाहतूक बंद असल्याने शासनाकडून सवलत मूल्याची प्रतिपूर्ती यापुढे मिळणे अशक्य आहे. त्यामुळे एस. टी. कर्मचार्‍यांच्या वेतनाची कोंडी निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या वाहतुकीतून डिझेलचा खर्चही निघत नाही. त्यामुळे वेतन होत नाही. सर्व कामगारांना वेतन देण्याचे आदेश शासनाने काढले पण एसटी कामगारांना जूनचे वेतन मिळालेले नाही.

संचित तोटा 6 हजार रुपये

शासकीय कर्मचार्‍यांच्या तुलनेत एस. टी. कर्मचार्‍यांचे वेतन अत्यल्प आहे. तसेच रोजंदारी कर्मचारी, अनुकंपा तत्वावरील लिपीक-टंकलेखक, सहाय्यक यांचे काम थांबवले आहे. कर्मचार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. एसटीचा संचित तोटा सुमारे 6 हजार कोटींपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे महामंडळास शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळाल्याशिवाय महामंडळाची आर्थिक स्थिती पूर्वपदावर येणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT