MSEDCL
MSEDCL 
कोकण

MSEDCL : कोकण विभागात १३६ कोटी थकीत

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : महावितरण कंपनीच्या कोकण प्रादेशिक विभागात लघुदाब ग्राहकांकडे १३६ कोटींची थकबाकी राहिली आहे. ती थकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांनी केले आहे. कोकण प्रादेशिक विभागात कल्याण, भांडूप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचा समावेश आहे.

महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात कृषिपंप ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ५० लाख १९ हजार लघुदाब ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी तीन हजार ५६२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. महावितरणची सध्याची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे रेशमे यांनी केले आहे. वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्याचे निर्देश देतानाच या कामात हलगर्जीपणा करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांविरूद्ध कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. या विभागातील थकबाकीचा वाढता डोंगर महावितरणच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम करणारा ठरत आहे.

विनंती व पाठपुरावा करून पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचे चालू वीजबिल वसूल करावे. याशिवाय चालू वीजबिलाचा भरणा करणार्‍या कृषिपंप ग्राहकांना थकबाकीत ६६ टक्क्यांपर्यंत सवलत देणार्‍या कृषिपंप धोरण २०२० योजनेचा लाभ देऊन थकबाकी वसुलीला चालना द्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

एक दृष्टिक्षेप..

  • लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांकडे थकीत..

  • ४३ लाख २४ हजार घरगुती ग्राहकांकडे ७३९ कोटी

  • ५ लाख २३ हजार व्यावसायिक ग्राहकांकडे ३०६ कोटी

  • १ लाख ४ हजार औद्योगिक ग्राहकांकडे ३७२ कोटी

  • २३ हजार ६४९ पाणीपुरवठा योजनांकडे ४९८ कोटी

  • ४४ हजार ७५४ पथदिवे जोडण्यांचे १ हजार ६४६ कोटी

एक नजर..

  • पाचशे रुपयांपेक्षा अधिक थकबाकीः २० लाख ७१ हजार घरगुती ग्राहक

  • व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांकडे थकबाकीः २ हजार ९०९ कोटी

बिल वसूल करावी अथवा वीजपुरवठा खंडित करावा

पाचशे रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या २० लाख ७१ हजार घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे असलेली २ हजार ९०९ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करावी अथवा त्यांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT