Mahavikas Aghadi meeting also postponed kokan political marathi news 
कोकण

सभापतिपदाच्या निवडीत राष्ट्रवादीत कुरघोडीचे राजकारण 

नागेश पाटील

चिपळूण (रत्नागिरी) :  कोरोना परिस्थितीमुळे लांबणीवर पडलेल्या पंचायत समिती सभापती, उपसभापती बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सभापतिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे तर उपसभापतिपद शिवसेनेकडे देण्याचे यापूर्वीच ठरले होते. त्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरूच ठेवली आहे. महाविकास आघाडीच्या निर्णयात राष्ट्रवादीकडे सभापतिपद येणार असले तरी विविध कारणांनी त्याकडे कानाडोळा केल्याचे दिसते. सरपंच निवडीपूर्वी कादवड ग्रामपंचायतीत झालेले फोडाफोडीचे राजकारण रंगले. त्यामुळे राष्ट्रवादी अनेक सदस्य, पदाधिकारी संतप्त आहेत. त्याचे पडसादही पदाधिकारी बदलावर उमटू लागले आहेत. 

चिपळूण पंचायत समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी 9 सदस्य आहेत. सुरवातीच्या अडीच वर्षासाठी सभापती, उपसभापतीची निवड चिठ्ठीद्वारे झाली होती. त्यानुसार अडीच वर्षापासाठी राष्ट्रवादीच्या पूजा निकम सभापती तर शिवसेनेचे शरद शिगवण उपसभापती झाले. त्यांचा कालावधी संपल्यानंतर सभापतिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसला व शिवसेनेस प्रत्येकी सव्वा वर्षाचा कालावधी देण्याचे ठरले होते. महाविकास आघाडीतर्फे झालेल्या निर्णयानुसार शिवसेनेकडून सभापतिपदासाठी धनश्री शिगवण तर उपसभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडून पाडुरंग माळी यांना संधी मिळाली. आता त्यांचा कालावधी उलटून दोन महिने झाले आहेत. 

राष्ट्रवादीकडे सभापतिपद येणार असल्याने रिया कांबळे, समिक्षा घडशी इच्छुक आहेत. शिवसेनेकडूनही गटनेते राकेश शिंदे, प्रतापराव शिंदे, सुनील तटकरे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडे सभापतिपद आल्यानंतर पक्षाला पर्यायाने आमदार शेखर निकम यांच्या राजकीय गणितासाठी कितपत बळ मिळेल याचा अंदाज पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून घेतला जात आहे. इच्छुक पदासाठी मागणी करणारे दोन्ही सदस्य हे गुहागर मतदारसंघात समाविष्ठ होतात.

गेल्या वर्षी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना रिया कांबळेंना पद देण्याचा शब्द दिला होता. मात्र त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. कादवडमध्ये सरपंच निवडीपूर्वी फोडाफोडीचे राजकारण झाले. हे नाट्यही राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे सध्याच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बदल केल्यास अशा कुरघोडी घडू शकतात. त्यापेक्षा आहे ते बरे अशी भूमिका राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी घेतली आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीची संयुक्त बैठक लांबणीवर पडत असल्याची चर्चा आहे. 
 
चिपळूण पंचायत समितीत महाविकास आघाडीची सत्ता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सभापतिपद येणार असले तरी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच त्यावर निर्णय होणार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीतच पदाधिकारी निवडीबाबत अंतिम निर्णय होईल. सभापतिपद कोणाला द्यायचे हे पक्षांतर्गत बैठकीतच ठरवण्यात येईल. 

जयंद्रथ खताते, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस 

संपादन- अर्चना बनगे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT