kokan sakal
कोकण

कोकणला प्रेझेंटेबल प्रॉडक्ट बनवा

पर्यटनविषयक तज्ज्ञ वाटेकर यांचे मत; कोरोनोत्तर काळ ही सुवर्णसंधी साधायला हवी

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: कोकणात काही ठिकाणी अॅडव्हेंचर स्पोर्टस्, काही ठिकाणी डॉल्फिन दर्शन, बैलगाडी, उंटगाडी, घोडागाडी सुरू असते; पण हे पुरेसे नाही. कोकणचे केरळ, राजस्थानसारखे मार्केटिंग व्हायला हवे आहे. कारण पर्यटक येऊन पाहतात, त्यापेक्षा प्रचंड कोकण हे पर्यटनासाठी वाट पाहते आहे. कोकणला एक प्रेझेंटेबल प्रॉडक्ट म्हणून जगासमोर आणावे लागणार आहे, असे प्रतिपादन पर्यटनविषयक तज्ज्ञ धीरज वाटेकर यांनी केले.

जागतिक पर्यटन दिनाच्यानिमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले, कोरोनोत्तर काळात ग्रामीण डेस्टिनेशन्सना मोठ्या प्रमाणात संधी आहेत. शिवाय २०५० सालापर्यंत जगातील ६८ टक्के लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे कोकणचा विचार करता सर्वसमावेशक पर्यटनावर भर दिला पाहिजे. त्या दृष्टीने सरकार व स्थानिकांनी पावले उचलायला हवीत.

ते म्हणाले, ग्रामीण पर्यटनातील संभाव्य संधींचा विचार करता, कोकणसह महाराष्ट्रासाठी कोरोनोत्तर काळ ‘सुवर्णकाळ’ ठरेल. परदेशी पर्यटनात सर्वांत जास्त सहभाग हा ६० पेक्षा अधिक वय असलेल्यांचा असतो. कोरोनाने त्यांचा आत्मविश्वास कमी केला आहे. देशांतर्गतही फिरणारे लोकं ३/४ दिवसांच्या पर्यायांचा विचार करतील. पर्यटकांची वर्तमान मानसिकता पुरेशी कॅश करण्यासाठी कोकणीपण टिकायला हवे.

जलदुर्ग ही खूप मोठी श्रीमंती

जागतिक हेरिटेजचा विचार करता, सह्याद्रीतील किल्ल्यांसह जलदुर्ग ही कोकणची खूप मोठी श्रीमंती आहे. या जलदुर्गांभोवती थीम्स तयार होऊ शकतात. विजयदुर्गाची प्रसिद्ध पाण्याखालची भिंत, हेलियम पॉईंट पर्यटकांना पाहायला आवडतील. अॅडव्हेंचर सायकलिंग, बायकिंग, ट्रेकिंग इव्हेंटन्स, प्रायव्हेट जंगले वापरून जंगल ट्रेक, बर्ड वॉचिंग असं काही जोरदार सुरू झालं तर, पायाभूत सुविधा मिळाल्यास त्यांचे मार्केटिंग व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

हे करा

पर्यटकांच्या आरोग्याची नियमित चौकशी, आर्थिक व्यवहार डिजिटल करणे, पर्यटकांचे स्वागत करताना मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर वापरणे, जेवताना, वावरताना सुरक्षित अंतर ठेवणे, पर्यटन कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या साधनांचा वापर करणे, पर्यटकांची खोली, हॉल, जेवणाची जागा सॅनिटायझरने स्वच्छ करणे, ऑक्सिमीटर, तापमापन यंत्राने पर्यटकांची तपासणी करणे, उत्पादने विकतानाची काळजी आदी नियम स्वतःवर घालून घ्यावे लागतील.

जलदुर्ग ही खूप मोठी श्रीमंती

जागतिक हेरिटेजचा विचार करता, सह्याद्रीतील किल्ल्यांसह जलदुर्ग ही कोकणची खूप मोठी श्रीमंती आहे. या जलदुर्गांभोवती थीम्स तयार होऊ शकतात. विजयदुर्गाची प्रसिद्ध पाण्याखालची भिंत, हेलियम पॉईंट पर्यटकांना पाहायला आवडतील. अॅडव्हेंचर सायकलिंग, बायकिंग, ट्रेकिंग इव्हेंटन्स, प्रायव्हेट जंगले वापरून जंगल ट्रेक, बर्ड वॉचिंग असं काही जोरदार सुरू झालं तर, पायाभूत सुविधा मिळाल्यास त्यांचे मार्केटिंग व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

पर्यटकाला भांबावून सोडणे थांबवा

वाटेकर यांनी सांगितले, सरकारचे पर्यटन धोरण हे स्थानिकांना रोजगार मिळेल, असेच असायला हवे; परंतु आपली संस्कृती ‘अतिथी देवो भव’ म्हणत असल्याने स्थानिकांनी येणाऱ्या पर्यटकाला अव्वाच्या सव्वा किमती सांगून भांबावून सोडणे थांबवायला हवे. यासाठी यंत्रणा कार्यरत व्हायला हव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

आजचे राशिभविष्य - 17 मे 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2026

New Marathi Books Review : वाचनीय आणि संग्रहणीय! अध्यात्मापासून ते पर्यटनाच्या अनुभूतीपर्यंत, नव्या पुस्तकांची रंजक सफर

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ मे २०२६ ते २३ मे २०२६)

SCROLL FOR NEXT