chanderi lingi prastararohan campaign
chanderi lingi prastararohan campaign sakal
कोकण

Pali News : 'मॅकविला द जंगल यार्ड'च्या प्रस्तरारोहकांकडून अवघड चंदेरी लिंगी प्रस्तरारोहण मोहीम फत्ते

अमित गवळे

पाली - सुधागड तालुक्यातील प्रस्तरारोहक मॅकमोहन हुले व 'मॅकविला द जंगल यार्ड'च्या प्रस्तरारोहकांची रायगड जिल्ह्यातील पनवेल जवळील चंदेरी लिंगी प्रस्तरारोहण ही अवघड मोहीम रविवारी (ता. १४) फत्ते केली.

या चंदेरी लिंगी प्रस्तरारोहण मार्गास 'रेस्क्यू ऑफ फ्रेंड' असे नाव देण्यात आले होते. हा चढाई मार्ग कठीण श्रेणीमध्ये गणला जातो. यावेळी तब्बल १७० फुट उंच सुळका कृत्रिम आरोहणाद्वारे सर करण्यात आला. मॅकमोहन हुले यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली या मोहिमेत प्रणय पाटील,अभिजीत डिकोस्टा, राम वाघे आदी प्रस्तरारोहक सहभागी झाले होते. मॅकविला द जंगल यार्ड या संस्थेचे हे ७ वे कृत्रिम आरोहण होते.

या प्रस्तरारोहकांनी शनिवारी (ता.13) संध्याकाळी ५ वा. पनवेल, नेरे, शांतीवन, डुंदरे, तांमसई असा दुचाकीने प्रवास करत रात्री ८ वाजता ट्रेकला सुरूवात केली. ते चार तासात किल्ल्याजवळील गुहे जवळ पोहोचले व मुक्काम आणि रात्रीच जेवण करून गुहेत राहिले. या गुहेत ६ ते १० जणांची राहण्याची सोय आहे. येथे पाण्याची सोय ऑक्टोबर शेवटपर्यंत पावसावर अवलंबून असते. तसेच येथील टाक्यांत पाणी असते.

रविवारी (ता. १४) पहाटे सुळका चढण्यास सुरुवात केली. प्रथम टप्पा आरोहण मॅकमोहन यांनी सुरू केले त्यांना सुरक्षा दोर प्रणय पाटील यांनी दिला. दुसऱ्या टप्प्यात दोघेही पोहोचले. त्यानंतर अभिजीत डिकोस्टा व राम वाघे यांनी क्रॅक मधुन आरोहण झूमर व सुरक्षादोरच्या साह्याने केले. त्यानंतर अंतिम टप्प्यावर दुपारी दोन वाजता माथा गाठला.

अवघड चढाई

प्रस्तरारोहणासाठी एका झाडाला दोर लावुन लिंगी-कंगोर्यात उतराव लागते व प्रस्तरारोहणाला सुरूवात होते. तीन टप्प्यांत आरोहण पूर्ण होते. पहिला टप्पा गवताळ घसरडी, मुरमाड निसरडा कातळ आसल्याने तेथे प्रस्तरात्मक खिळा नाही. ७० फुटावर पहिला खिळा आहे. नंतर दुसऱ्या टप्प्याला सुरवात होते. यव मार्गावर ४ खिळे आहेत. ६० फुटांनंतर तिसरा अंतिम टप्पा आहे. तिथे ४ खिळे आहेत. हे कृत्रिम आरोहण असल्याने फ्रेंड्स, पाचर, पेग चा वापर करता येतो.

'रेस्क्यू ऑफ फ्रेंड' नाव का?

मागील वर्ष ३ जानेवारी २०२३ गिरिविराज हायकर्सने येथील लिंगी क्र.३ वर तिसऱ्या पिढीच्या नवोदित गिर्यारोहकांनी ८ रिंग बोल्ट, ९ पाचर, ८ फ्रेंड्स ही साधने वापरीत एका नवीनच अवघड मार्गाने सुमारे १७० फूट उंच सुळक्यावर चढाईत यश मिळवले. मोहिमेत चढाई करताना एका क्रॅकमध्ये वापरलेला फ्रेंड्स अडकला व शेवटी मोहीम फत्ते झाल्यावर अथक परिश्रम करून त्यास काढण्यात आले. म्हणूनच या रूटला "रेस्क्यू ऑफ फ्रेंड"असे नाव देण्यात आले. असे मॅकमोहन हुले यांनी सांगितले.

असा आहे किल्ला

किल्ल्यावरील गुहेच्या अलीकडे एक पडक्या अवस्थेतील शेष तटबंदी दिसते. किल्ले पणाची हीच काय ती खूण. मे १६५६ मध्ये शिवरायांनी कल्याण भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलुख घेतला. तेव्हा त्यात हा गडही मराठ्यांच्या ताब्यात आला. अल्प विस्तार, पाण्याची कमी साठवणूक, बांधकामाचा अभाव मर्यादित लोकांची मुक्कामाची सोय. अतिशय अवघड वाट हे सारे पाहून हा किल्ला नसून एक लष्करी चौकी असेच वाटते. काही जणांच्या मते ७ ऑक्टोबर १९५७ रोजी चंदेरी किल्ल्याच्या सुळक्यावर संघटित प्रस्तरारोहणाचा प्रारंभ झाला.

कठीण बेजोड परिसर

चंदेरी, म्हसमाळ नवरी,बोयी या डोंगररांगेतील एक व पनवेलच्या प्रभागमंडळाचे मानकरी असणाऱ्या कर्नाळा, प्रबळगड, इरशाळगड, माणिकगड, पेब, माथेरान आणि अशा कितीतरी गडांपैकी एक म्हणजे चंदेरी होय. चंदेरीच्या पायथ्याशी असलेली घनदाट वृक्षराजी, गवताळ घसरडी वाट अन् मुरमाड निसरडा कातळमाथा म्हणजे सह्याद्रीतील एक बेजोड असा हा कठीण परिसर आहे. तामसाई गावाच्या हद्दीत असणारा असा हा दुर्ग प्रस्तरारोहण कलेची आवड असणाऱ्या गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT