malaria mosquito Sakal
कोकण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिवताप (मलेरिया) रुग्णांमध्ये वाढ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिवताप (मलेरिया) रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. नोव्हेंबर अखेर जिल्ह्यात ३२ हिवतापाचे रुग्ण आढळले आहेत.

नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिवताप (मलेरिया) रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. नोव्हेंबर अखेर जिल्ह्यात ३२ हिवतापाचे रुग्ण आढळले आहेत. जिल्हा हिवताप विभाग सतर्क झाला असून रुग्ण आढळलेल्या भागात सर्वेक्षणाचे व रक्त नमुने घेण्याची काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी रमेश कर्तस्कर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात नव्याने मलेरियाचे ४ रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यात ३२ रुग्ण सापडले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी हिवतापाचे अधिक रुग्ण सापडले आहेत. गतवर्षी नोव्हेंबर अखेर २२ रुग्ण सापडले होते तर चालू वर्षी नोव्हेंबर अखेर ३२ हिवतापाचे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये वैभववाडी तालुक्यात १, देवगड २, कणकवली ६, मालवण ३, कुडाळ ६, वेंगुर्ला २, सावंतवाडी ८ तर दोडामार्गमध्ये नव्याने ४ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा हिवताप विभाग सतर्क करण्यात आला आहे. हिवताप विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रुग्ण सापडलेल्या गावांमध्ये तात्काळ सर्वेक्षण सुरू केले असून रक्त नमुने गोळा केले जात आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जिल्ह्याच्या सर्व सीमा खुल्या केल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध क्षेत्रात काम करणारे परजिल्ह्यातील कामगार मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. यामुळे हिवतापाच्या रूग्ण संख्येत वाढ झाली आहे. या कामगारांमध्ये हिवतापाचे रुग्ण अधिक आढळले आहेत. आतापर्यंत मिळालेले रूग्ण हे परजिल्ह्यातील कामगारच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा बाहेरून येणारे बांधकाम क्षेत्रातील कामगार, ऊस तोडकाम करणारे कामगार, यांना केंद्रबिंदू धरून जिल्ह्यात सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. हिवतापाच्या रुग्णांचा जलदगतीने शोध घेणे आणि त्यांना उपचारा खाली आणण्यासाठी जिल्हा हिवताप विभाग सतर्क झाला आहे. अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी कर्तस्कर यांनी आज दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Challan Recovery: थकबाकी असलेला ट्रॅफिक दंड आता वीज बिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाची सरकारांना महत्त्वाची सूचना

Dharashiv Kirtankar Fight : 'माझी सुपारी का घेतली?'; धाराशिवमध्ये दोन महाराज आपापसात भिडले, थेट हाणामारीनंतर बाल वारकऱ्यांना घेऊन महामार्गावर केलं आंदोलन

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

Latest Marathi News Live Update: पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक

Pune Traffic: अंगारकी संकष्टीत दगडूशेठ गणपती दर्शनासाठी गर्दी; पुणे मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल

SCROLL FOR NEXT