mango and cashew crop fire by short circuit in ratnagiri 3 lakh rupees damage in fire
mango and cashew crop fire by short circuit in ratnagiri 3 lakh rupees damage in fire 
कोकण

शेतकरी झाला हताश ; अचानक लागलेल्या आगीत आंबा, काजूची बाग जळुन खाक

सकाळ वृत्तसेवा

पावस (रत्नागिरी) : रत्नागिरी तालुक्‍यातील नाखरे मुंगनेकरवाडी परिसरातील दोघांच्या आंबा कलम बागेला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने अनेक आंबा-काजू कलमे आगीत होरपळली असून दोन-तीन लाखांचे नुकसान झाले आहे.

नाखरे गावातील कृष्ण वसंत महाडिक यांची २२ हापूस कलमे व नारायण बाबू मुंग नेकर यांची पंधरा हापूस कलमे व १५ काजू कलमे आगामुळे खाक झाली. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बागेच्या जवळून जाणाऱ्या विद्युत कंपनीच्या लाईनमध्ये सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे विद्युततारांचे घर्षण झाल्याने बागेमध्ये असलेल्या गवताने शॉर्टसर्किटमुळे पेट घेतली आणि या परिसरातील दोघांच्या बागेत आगीने प्रवेश केला.

या परिसरातील ग्रामस्थांनी नळपाणी योजना खासगी विहिरी यांच्या पाण्याच्या माध्यमातून करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर दोन्ही बागेतील असलेली आग आटोक्‍यात आली. यात दोन्ही बागायतदारांचे सुमारे दोन ते तीन लाखाचे नुकसान झाले. हापूस आंब्याला पोषक वातावरण असताना आणि हंगाम चांगला जाण्याचे संकेत असतानाच बागेला आग लागल्याने दोन्ही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT