कोकण

दर्जा घसरल्याने रत्नागिरीतून थेट निर्यातीत ‘खो’

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - अखेरच्या टप्प्यात हापूसच उत्पादन मोठ्या प्रमाणात आले तरीही दर्जा घसरल्यामुळे १५ मे नंतर रत्नागिरी प्रक्रिया केंद्रातून हापूसची निर्यात मंदावली. मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात अवघ्या २ टन हापूसची निर्यात झाली. एका कन्साईनमेंटमधील पन्नास टक्‍के आंबा नाकारला गेल्यामुळे निर्यातदारांना दर परवडत नव्हता. शेवटी निर्यातीसाठी रत्नागिरीतून थेट आंबा नेण्यास निर्यातदारांकडूनच नकारात्मक पवित्रा घेतला.

शेवटच्या टप्प्यात दर्जा घसरला. आंबा भरपूर प्रमाणात येत होता. एका टनात पन्नास टक्‍के फळ डागी सापडत होते. त्यामुळे अर्धा माल बाजूला काढावा लागला. त्यात काही फळे  देठ नसलेली, आपटलेली आणि काही फळांना काळे होल पडलेली अशी होती. ही फळे निर्यातीच्या दर्जाला उपयुक्‍त नसतात. त्यावर उष्णजल प्रक्रिया केल्यास ती काळी पडतात. जागेवर विकत घेतलेल्या मालापैकी पन्नास टक्‍के घट झाल्यामुळे निर्यातदाराला ते परवडले नाही. अखेरीस शेवटच्या १५ दिवसात दोन टनाची निर्यात झाली.

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा पिकाला मार्च, एप्रिल महिन्यात चांगलाच तडाखा बसला. गतवर्षी रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रातून दहा ते बारा टन आंबा निर्यात झाला होता. यावर्षी ते सद्‌गुरु एंटरप्रायजेसकडे दिले गेले. त्याचा फायदा घेत स्थानिक बागायतदारांनी दोन महिन्यात ३२ टन हापूस कॅनडा, युरोप, अमेरिका, दुबईला पाठविला. १५ मे पर्यंत निर्यातीचे प्रमाण चांगले होते; मात्र त्यानंतर शेवटच्या टप्प्यात उतरती कळा लागली. स्थानिक स्तरावरुन निर्यातीस निर्यातदारांकडूनच असहकाराचे धोरण स्वीकारले.

देशांतर्गतसाठी १५० टनवर प्रक्रिया पुणे, मुंबई, सोलापूरसह सांगलीमध्ये हापूस विक्रीसाठी १५० टन माल रत्नागिरी केंद्रात पिकवला.आंबा पिकविताना एक दिवस गॅसिंग, दोन दिवस रायपनिंग चेंबरमध्ये ठेवला जातो. बागायतदारांचा प्रतिसाद मिळाल्याचे नारकर यांनी सांगितले.

आकडे बोलतात......
देश    निर्यात (मेट्रीक टन)
युरोप    ३.६ 
कॅनडा    ११.०
युएसए    ३.५
दुबईला    १५.०
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT