Gathering
Gathering 
कोकण

जॅक ऍन्ड जील शाळेचा ‘’चिमुकले उत्सव’’

अमित गवळे

पाली (रायगड) : येथील जॅक ऍन्ड जील शाळेचे दहावे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे नाव ‘’चिमुकले उत्सव’’ ठेवण्यात आले होते. येथील अागर अाळीतील बापुजी मंदीरा समोरील प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अापली उत्तम प्रतिभा व नृत्याविष्कारांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

या चिमुकल्यांना प्रोत्साहन देण्याकरीता विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत मान्यवरांसह नागरीक व पालक मोठ्या संख्येने उपस्तीत होते. ‘’चिमुकले उत्सव’’ या कार्यक्रमास खुप प्रतिसाद लाभला. जॅक ऍन्ड जील पाली शाळेच्या संचालिका प्रभा द्रविड यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार झाला. कार्यक्रमाची सुरुवात देशभक्तीपर गाण्याने करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमात लहानग्यांनी आपल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. तर अडीच ते तीन वर्षांच्या चिमुरड्यांनी धैर्य व आत्मविश्वासाने केलेले इंग्रजी मधील सूत्रसंचालन ऐकून सारेच थक्क झाले. 

प्रास्ताविकात संचालिका प्रभा द्रविड यांनी अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमधील सुप्त कला क्रिडा गुणांना व बौध्दिक कौशल्यास वाव देणेकरीता शाळेत वर्षभर राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांमधील क्षमतेचे मुल्यमापन करुन त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्यांना प्रेमाने शिकविल्यास त्याचा अधिक लाभ होतो. व विद्यार्थ्यांची प्रगती साधली जाते. पाया भक्कम करायचा असेल तर विद्यार्थ्यांना तणावमुक्त अभ्यास करण्यास वाव देणेच अधिक लाभदायक ठरते असे मत प्रभा द्रविड यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून गौरवण्यात आले.

सुधागडसारख्या आदिवासी बहूल तालुक्यात इंग्रजी माध्यमाचे दालन उघडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकून राहण्याच्या दृष्टीने शाळेच्या संचालिका प्रभा द्रविड व त्यांचे सहकारी अतोनात मेहनत घेत आहेत. असे गिता पालरेचा यांनी आपल्या मनोगतात सांगितले.विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची तळमळ व घेत असलेली सातत्यपुर्ण मेहनतीचे कौतुक करावे तितके थोडेच. लहान वयात चिमुकल्यांचे स्टेज डेअरिंग कौतुकास्पद असल्याचे सभापती साक्षी दिघे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या संचालिका प्रभा द्रविड यांच्यासह विदयार्थी, शिक्षक व पालकांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास माजी जि.प सदस्या गिता पालरेचा, पाली पंचायत समिती सभापती साक्षी दिघे, ग.बा.वडेर हायस्कुलचे मुख्याध्यापक अजय पाटील,जॅक ऍन्ड जीलच्या संचालीका प्रभा द्रविड, अॅड. नितीन शेवाळे,सामाजिक कार्यकर्त्या लिना घरत, सुजीत बारस्कर, विजय धानुधरे आदिंसह विद्यार्थी, पालक बहुसंख्येने उपस्थीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT