Pali
Pali 
कोकण

सावित्रीच्या लेकिंनी साजरी केली सवित्रीबाई फुलेंची जयंती

अमित गवळे

पाली : सुधागड तालुका बौद्धजन पंचायत र. नं. 2756 या संस्थेच्या वतीने बुधवारी (ता. 3) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पालीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जयंती साजरी झाली. यावेळी विविध वैचारीक व प्रबोधनकारी कार्यक्रमाचे आयोजन करुन सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात आले. 

आद्य शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य प्रेरणादायी व क्रांतीकारी आहे. सावित्रीबाईंचा निस्सीम त्याग व धैर्यामुळे आजच्या महिलेला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. सावित्रीमाईंचे प्रगतशिल व शिक्षित समाज घडविण्याचे कार्य पुढे नेणे हिच खरी काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सुधागड तालुका बौध्दजन पंचायत र. नं. 2756 या संस्थेच्या महिला अध्यक्षा रोहिणी जाधव यांनी केले. नुतन शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. शिक्षणाखेरीज मनुष्याचा विकास साधणार नाही असे सांगितले. अस्मिता कांबळे म्हणाल्या की फुले दाम्पत्यांनी जुन्या,चालीरित्या व रुढी परंपरांना मोडून काढण्याचे काम केले. समतेचा ज्वालामुखी ह्रदयात ठेवून कायम समाजसुधारणेचे कार्य केले. 

आरती महाडीक म्हणाल्या की जोतीबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या कार्याला अधिक मजबुती देण्याचे काम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान बहाल करुन दिले. संविधानाने महिलांसह प्रत्येक नागरीकाला समान हक्क व अधिकार प्राप्त झाले आहेत. यावेळी प्रभाकर गायकवाड यांनी म. जोतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून समाज शिक्षीत करण्याकरीता केलेल्या महान कार्याचे महत्व विषद केले. 

यावेळी बौध्द धम्म प्रसारक प्रभाकर गायकवाड, रि.पा.इं सुधागड तालुकाध्यक्ष राहूल सोनावळे, महिला अध्यक्षा रोहिणी जाधव, सुधागड तालुका बौ.पं.म.कमिटी अध्यक्ष दिपक पवार, भगवान शिंदे, रविंद्रनाथ ओव्हाळ, दिलीप मोरे, बौध्दाचार्य भिम महाडीक, सिध्दांत गायकवाड, विवेक रोकडे, सतिष गायकवाड, नुतन शिंदे, अस्मिता कांबळे, अंकिता गायकवाड, आरती महाडीक, सविता मोरे, सारिका गायकवाड, वंदना गायकवाड, ज्योती जाधव, रोशनी गायकवाड,आदिंसह महिला मंडळ, भिम अनुयायी, धम्मबांधव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT