snake
snake 
कोकण

वाढदिवसादिवशीच सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी: लांजा तालुक्यासह राजापूर, रत्नागिरी शहरात सर्प मित्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुजित कांबळे (वय ४०, रा. लांजा) यांचा वाढदिवसा दिवशीच सर्प दंशाने मृत्यू झाल्याने लांजा शहरावर शोककळा पसरली आहे. उपचारा दरम्यान शनिवारी रात्री  साडेआठ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

सुजित कांबळे शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लांजा शहरानजिक असलेल्या कुवे येथे कामानिमित्त गेले होते. मुख्य रस्त्यावर दुचाकी उभी करून ते  उभे असताना बाजूच्या गवतातून आलेल्या कोबरा जातीच्या सर्वाधिक विषारी असलेल्या सापाने दंश केला. पाय जवळ दंश करून जाणाऱ्या सपाला त्यांनी पाहिले .त्यानंतर त्याच अवस्थेत त्यांनी घरी फोन करून, मला विषारी साप चावला असून मी कुवे येथे आहे. मला रुग्णालयात न्यायला या, असे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ कुवे येथे धाव घेतली.

नातेवाईक, मित्र कुवे येथे पोहचले. तेव्हा सुजित कांबळे दुचाकीवर डोके टेकून बसले होते. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ लांजा ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथे उपचार करून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री साडेसात वाजता त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सुजित यांचा मृत्यू झाला.

काही तासांपुर्वी घरातून गेलेले सुजित कांबळे वाढदिवस असल्यामुळे लवकर घरी येणार होते. ते घरी येण्याऐवजी त्यांच्या मृत्युचे वृत्त घरी पोहचल्यानंतर सर्वत्र सन्नाटा पसरला. सर्व सर्पमित्रासह लांजावासियांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तर रत्नागिरीतील सर्व सर्पमित्रहि जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT