Marathi News_Kokan_Seized more than seventy thousand alchohol
Marathi News_Kokan_Seized more than seventy thousand alchohol  
कोकण

सत्तर हजारहून अधिक किमतीची विदेशी व देशी दारु जप्त

अमित गवळे

पाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील परळी येथे विदेशी दारु व देशी दारु विक्रीच्या अवैध धंद्यावर पोलिसांनी शनिवारी (ता. 9) सायंकाळी पावणे आठच्या सुमारास धाड टाकली. यावेळी सत्तर हजार चारशे सात रुपये किमतीची विदेशी व देशी दारु जप्त करण्यात आली.

उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड व पोलिस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत सविस्तर माहीती अशी की सुधागड तालुक्यातील परळी गावात सुनिल कारेकर हे त्यांच्या घराजवळ त्यांचे परमिट रुम बंद झाल्याने विदेशी दारु व बियर विक्रीचा धंदा करतात, असे निनावी फोन पोलिसांना येत होते. यानुसार पोलिस उपनिरिक्षक एस. बी निकाळजे, पोलिस कॉन्स्टेबल भोईर, एफ.बी तडवी, पोलिस हवालदार संतोष साळुंके, महादेव पाटील, सहाय्यक फौजदार चौगले हे रोहा धाटाव येथून पाली पोलिस ठाणे येथे आले. पाली पोलिस स्थानकातील महिला पोलिस नाईक कोंजे यांना सोबत घेवून परळी येथे गेले. तेथील बहिरीनाथ मंदीराजवळ दबा धरुन थांबले. 

उपनिरिक्षक निकाळजे दोन पंचांना घेवून छाप्यासाठी सुनिल कारेकर यांच्या घराकडे जात होते. तेव्हा त्यांच्या घराच्या पडवीच्या खाली गल्लीमध्ये लोक येजा करीत असल्याचे त्यांना दिसले. व एक महिला पडवीमध्ये काळ्या पिशव्या घेवून बसलेली दिसली. पोलीसांना पाहताच लोक सैरावैरा पळून गेले. म्हणून पोलीसांना त्या महिलेचा संशय आल्याने महिला पोलीस नाईक कोंजे यांनी धावत जावून महिलेला अडविले. आणि तिच्या जवळ काय आहे याची खात्री केली असता त्या महिलेच्या आजुबाजूला दारु असलेले पुठ्याचे खोके दिसून आले. यावेळी तिच्या ताब्यातील विदेशी दारु जप्त करण्यात आली. सदर कारवाईत एकूण 70,407 रुपये किमतीचा विदेशी दारुचा साठा पकडण्यात आला. यावेळी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

पाली, सुधागड परळी येथे जप्त केलेल्या विदेशी दारुच्या साठ्यासह पोलीस. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT