कोकण

माजगावात खळबळ: आठ दिवसात निगेटिव्हचा रिपोर्ट झाला पॉझिटिव्ह

शिवप्रसाद देसाई

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : आठ दिवसांपूर्वी रॅपिड टेस्टमध्ये आलेला निगेटिव्ह रिपोर्ट आठ दिवसानंतर पॉझिटिव्ह असल्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला दिल्याने माजगावमध्ये (Mazgaon)एकच खळबळ उडाली. याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर (Health Officer Varsha Shirodkar) यांना जाब विचारला असता पोर्टलमध्ये चुकीची माहिती भरल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले.

Mazgaon incidence cases Negative report positive kolhapur marathi news

माजगाव येथील एका व्यक्तीने आठ दिवसांपूर्वी रॅपिड टेस्ट केली होती. त्यावेळी त्याला तत्काळ निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट दिला होता. दरम्यान, आज संबंधित व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याबाबत माहिती माजगाव उपकेंद्राला मिळाली. संबंधित व्यक्तीला याबाबत कळविल्यानंतर ती व्यक्ती तसेच घरची मंडळी घाबरले. संबंधिताने याबाबत भाजप पदाधिकारी अजय सावंत यांच्या कानावर ही बाब घातली. त्यांनी बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी यांच्या समवेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिरोडकर यांना जाब विचारला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळा वेजरे,मंगेश राठवड, अमित परब आदी उपस्थित होते.

संबंधित व्यक्ती ही निगेटीव्ह आहे, घाबरण्याचे कारण नाही, निगेटिव्ह पॉझिटिव्हबाबत पोर्टलमध्ये माहिती भरताना हा घोळ झाला.

- वर्षा शिरोडकर, आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : संस्थानासाठी ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावला येणार

Pune News: वनविभागाच्या जमिनींची पडताळणी सुरू! पुणे जिल्ह्यात ‘एसआयटी’मार्फत तपासणी; सरकारला सादर करणार अहवाल, नेमंक काय कारण?

Maharashtra Weather Update : अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत आजही पावसाचा इशारा

Satara Child Marriage: कुमारवयातच वाढतेय संसाराचे ओझे; प्रेमाच्या आड ‘छुप्या बालविवाहा’चे सातारा जिल्ह्यात वाढताहेत प्रकार, संकटाची चाहूल!

फसवून लाटलेली जागा-जमीन मिळते परत! ३ वर्षांच्या आत द्यावी लागते तक्रार; फसलेल्याने वकिलांमार्फत ‘येथे’ करावा अर्ज, ‘या’ ६ बाबी लक्षात ठेवाच...

SCROLL FOR NEXT