Memu special Train esakal
कोकण

Memu Train : गणेशोत्सवात गावी येणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; आता चिपळूणपर्यंत धावणार मेमू स्पेशल गाडी

१३ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत युवा चिपळूण मेमो स्पेशल गाडीच्या एकूण ३६ फेऱ्या होणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कोकण रेल्वे तसेच मध्यरेल्वेने रत्नागिरीपर्यंत धावणारी मेमू स्पेशल गाडीदेखील जाहीर केली आहे.

चिपळूण : दिवा ते चिपळूण मार्गावर १३ सप्टेंबरपासून ३ ऑक्टोबरपर्यंत मेमू स्पेशल गाडी (Memu Special Train) चालवण्यात येणार आहे. पूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे मुंबईहून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

१३ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत युवा चिपळूण मेमो स्पेशल गाडीच्या एकूण ३६ फेऱ्या होणार आहेत. दिवा ते चिपळूण मेमू स्पेशल दिवा येथून ७ वाजून ४५ मिनिटांनी सुटून चिपळूणला १ वाजून २५ मिनिटांनी पोहोचणार आहे.

चिपळूणला आलेली मेमू स्पेशल गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १ वा. सुटून रात्री ७ वा. दिवा जंक्शनला पोहोचेल. दिवा चिपळूण मेमू स्पेशल गाडीचे थांबे पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापेवामने, करंजाळी वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी, खेड तसेच अंजनी. दिवा ते चिपळूण ही आठ डब्यांची गाडी असेल.

पूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे नियमित आणि विशेष गाड्यांचे कन्फर्म आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आधी कोकण रेल्वे तसेच मध्यरेल्वेने रत्नागिरीपर्यंत धावणारी मेमू स्पेशल गाडीदेखील जाहीर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT