मंडणगड - प्रचार सभेत बोलताना पर्यावरण मंत्री रामदास कदम.
मंडणगड - प्रचार सभेत बोलताना पर्यावरण मंत्री रामदास कदम. 
कोकण

शिवसेनेशी बेईमानी करणारे मातीमोल; रामदास कदम यांची टीका

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड - ज्यांनी, ज्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली, विश्वासघात केला, ते सर्व मातीमोल व भुईसपाट झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणारे स्वतःचे राजकीय महत्त्व गमावून बसले. आज त्यांची अवस्था लुत लागलेल्या कुत्र्यासारखी झाली असल्याची बोचरी टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विरोधकांवर केली. 

शुक्रवारी (ता. 18) युतीचे उमेदवार योगेश कदम यांच्या मंडणगड येथील प्रचारसभेत ते बोलत होते. रामदास कदम यांनी  शिवसेना सोडलेल्या नारायण राणे, गणेश नाईक, छगन भुजबळ यांचा समाचार घेत, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना निर्वाणीचा इशारा देताना आता त्यांची पाळी असल्याचे सांगितले. 

25 वर्षे आमदारकी दिली असताना काहीही काम न करता ती फुकट घालवली. आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ""2014 च्या निवडणुकीत एकमेकांच्या उरावर बसलेले सूर्यकांत दळवी आणि संजय कदम आता एकमेकांसाठी काम करतात, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. साडेतीन वर्षात दापोली मतदारसंघात कोट्यवधींचा निधी आणून विकासाला गती देण्याचे काम केले. आगामी काळात योगेश कदम यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ मॉडेल करणार असून त्याचा सर्वांगीण विकास करण्यास कटिबद्ध आहे.''

या वेळी संतोष गोवळे, प्रताप घोसाळकर, सुलतान मुकादम, सिद्धार्थ कासारे, अनंत लाखण, आदेश केणे, विनोद जाधव, संजय शेडगे आदी उपस्थित होते. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT