The missing boy from Golvan was found in Goa 
कोकण

गोळवणचा बेपत्ता मुलगा सहा वर्षांनी सापडला

प्रशांत हिंदळेकर

मालवण (सिंधुदुर्ग) - गेली सहा वर्षे बेपत्ता असलेल्या अरुण विजय गावडे (वय 24, रा. गोळवण) या युवकाचा शोध घेण्यास कट्टा पोलिस दूरक्षेत्राच्या पोलिसांना यश मिळाले. सहा वर्षांनी भेट झालेल्या मुलाला पाहून आई, वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. 

तालुक्‍यातील गोळवण गावातील अरुण गावडे हा युवक जून 2014 मध्ये आपल्या आई वडिलांना कामानिमित्त गोवा येथे जात असल्याचे सांगून निघून गेला होता. त्यानंतर आजपर्यंत गेली सहा वर्षे त्याचा कोणताच पत्ता नव्हता. आई, वडिलांना फोन नाही ना अन्य कोणताही संपर्क नाही. त्यामुळे त्याच्या आई, वडीलांनी कट्टा पोलिस ठाण्यात मुलगा हरवला असल्याची तक्रार दाखल केली होती. 

सहा वर्षे लोटली; परंतु मुलाचा कोणताही पत्ता लागला नाही. पोलिस ठाण्यातील अंमलदार बदलले; पण तरीही त्याची कोणतीही माहिती मिळाली नाही. मुलगा परत यावा यासाठी आई वडिलांनी अनेक उपास, नवस केले. अखेर त्याच्या हाकेला परमेश्वर धावला तो कट्टा पोलिस ठाण्यातील पोलिस रुक्‍मांगद मुंडे, योगेश सरफदार आणि संतोष पुटवाड यांच्या रूपाने. अरुण गावडे याचे जुन्या मोबाईल नंबरचे सिमकार्ड मुदत संपल्याने बंद होणार होते. त्यासाठी त्या सिमकार्डवर रिचार्ज करण्यासाठी कंपनीकडून फोन आला आणि तो फोन त्याच्या घरी आला. ही माहिती त्याच्या आई, वडिलांनी पोलिस ठाण्यात जाऊन दिली. 

अन्‌ पत्ता मिळाला 
कट्टा पोलिसांनी पुन्हा त्या कंपनीला संपर्क साधून त्या सिमकार्डचे लोकेशन मिळवले आणि त्यानुसार अरुण गावडे याचा पणजी येथे एका हॉटेलमध्ये पत्ता मिळाला. त्यानुसार सर्व जाबजबाब पूर्ण करुन त्याला आज गोवा येथून सिंधुदुर्गात आणून मालवण कट्टा येथे पोलिस ठाण्यात त्याच्या आई, वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले. सहा वर्षांनी एकुलत्या एक मुलाची भेट झाल्यानंतर आई, वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. या प्रसंगाने खाकी वर्दीही गहिवरली. पोलिस हे खरोखरच परमेश्वर ठरल्याचे भावुक मत अरुणच्या आई, वडिलांनी व्यक्त केले.  

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor: भारत समिटमध्ये 115 परदेशी वक्त्यांना प्रवेश नाकारला; शशी थरूर यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

IND vs NZ 4th ODI: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Unplayable Deliveries असं काही नसतं, फलंदाजानं...; ८९ ऑल आऊटनंतर गौतम गंभीरकडून कानउघडणी

Thane Water Cut: ठाण्यात पुन्हा पाण्याचा ठणठणाट! सोमवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; कोणत्या भागांना फटका?

वर्षा उसगांवकर यांचे पती कोण आहेत? सोशल मीडियावर एकही एकत्र फोटो का पोस्ट करत नाहीत? अभिनेत्रीने सांगितलं कारण!

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मिठी नदीजवळ नाल्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT