The motor overturned due to loss of control 
कोकण

ताबा सुटल्याने मोटार पलटी, चौघे जखमी 

तुषार सावंत

कणकवली (सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा महामार्गावर वागदे डगळवाडी येथे गोवा ते मुंबईकडे जाणाऱ्या मोटार चालकाचा ताबासुटल्याने झालेल्या अपघात कांदिवली मुंबईतील चौघ किरकोळ जखमी झाले. चौपदरीकरणातील काही त्रुटीमुळे हा अपघात झाला आहे. भरधाव वेगातील मोटारीने अन्य तीन वाहनांना धडक दिली आहे. सुदैवाने मोठी जिवितहानी टळली आहे. हा अपघात आज सांयकाळी सहाच्या सुमारास झाला आहे. 

चालक देवाशीष बनूमलिक खाडंगा हे आपल्या ताब्यातील मोटर (एमएच 03 सीव्ही 1153 ) घेवून मुंबईच्या दिशेने जात होते. यावेळी मोटरीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात चालकासह सौरभ अशोक अगरवाल, स्वाती अशोक अगरवाल, तन्मय देवीशीष खाडंगा (वय 8 सर्व रा. कांदिवली मुंबई) हे जखमी झाले. त्यांच्यावर येथील उपजिल्हारूग्णालयात उपचार करण्यात आले.मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोटर रस्त्यावर पलटी झाली. तसेच रस्त्यावरील मोटरसायकल, टाटा हत्ती टेम्पो, दिलीप बिल्डकॉनच्या कॉंक्रीट मिक्‍सराही धडक दिली आहे.

यात मोटारीचे नुकसान झाले आहे. घटनास्थलावरून जखमींना उपचारासाठी ओसरगाव माजी सरपंच बबली राणे यांनी एका वाहनातून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. घटनास्थळी कणकवली पोलिस तसेच महामार्गा वाहतूक शाखेचे प्रविण सावंत, श्री. चिंदरकर आदी दाखल झाले होते. अपघातग्रस्तवाहने वाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

Sangli District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय राजकारण नको आमदार जयंत पाटील ; राज्यात दुष्काळ जाहीर करा

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

SCROLL FOR NEXT