Motorcycle Burnt In Phonda Ghat Sindhudurg Marathi News 
कोकण

फोंडाघाटमध्ये पूर्ववैमनस्यातून मोटरसायकल जाळल्याचा प्रकार 

सकाळ वृत्तसेवा

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - तालुक्‍यातील फोंडाघाट बावीचेभाटले येथे पूर्ववैमनस्यातून मोटरसायकल जाळल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार काल मध्यरात्री घडली. 

याबाबत जॅकलीन फर्नांडिस (वय 24 रा. फोंडाघाट बावीचे भाटले) त्यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार जयेश परब व अन्य दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी फर्नांडिस यांनी मोटरसायकल (एम एच 07 एए 8210) विनोद प्रभू यांच्या अंगणामध्ये ठेवलेली होती. काल मध्यरात्री फर्नांडिस बाथरुममध्ये आल्यानंतर घरासमोरील विनोद प्रभू यांच्या अंगणातील मोटरसायकल जळत असल्याचे दिसले.

यावेळी आपल्या परिचयाचे जयेश विजय परब व अन्य दोन साथीदार तेथे होते. आपल्याला पाहून ते पळून गेले, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. मोटरसायकलवर पेट्रोल ओतून गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. एका प्रकरणात आपण जयेश याला जाब विचारला होता. त्या रागातून त्यांनी हा प्रकार केला असून यामुळे 45 हजाराचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Indian Visa Regulations: परदेशी नागरिकांसाठी भारताचे व्हिसा नियम बदलले; एका चुकीमुळे होऊ शकते मोठी कारवाई!

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

मच्छिंद्र कांबळी यांचं अजरामर 'वस्त्रहरण' नाटक पुन्हा भेटीला येणार; 'हा' कसलेला अभिनेता साकारणार तात्या सरपंच

Latest Marathi News Live Update : गडचिरोली प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT