uddhav thackeray narayan rane
uddhav thackeray narayan rane 
कोकण

राज्यातील गोरगरीबांची उपासमार कधी थांबणार? ठाकरेंनी आतातरी बोलावं; नारायण राणेंचा निशाणा

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी : राज्यातील अनेक व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याला कारण लॉकडाउन आहे आणि लॉकडाउनला सर्वस्वी जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)आहेत, अस ट्वीट करत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप चे खासदार नारायण राणे(MP Narayan Rane)यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.कोरोनाची सध्याची परिस्थिती आणि भविष्यात येणारी तिसरी लाट लक्षात घेऊन राज्य सरकारने अनलॉक चे पंच टप्पे केले आहेत. मात्र यामध्ये लोकडाऊनमुळे त्रस्त मध्यम आणि सर्वसामान्य व्यक्तीला आधार देण्यासाठी कोणतीही दिलासादायक तरतूद केलेली नाही यावरून खासदार राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करून ठाकरेंना लक्ष केलं आहे. (mp-narayan-rane-criticism-chief-minister-uddhav-thackeray-political-marathi-kokan-news)

ते म्हणाले, 'राज्यातील उदयोगधंदे बंद, हॉटेल व्यवसायासह अन्य व्यवसाय बंद, छोटे व मोठे असे सर्व व्यावसायिक आर्थिक संकटात असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याला कारण लॉकडाउन आहे आणि लॉकडाउनला सर्वस्वी जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत.'

कोरोनाची दुसरी लाट सूरु आहे. त्यात अनेक जिल्हे बाधित आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा कमी पडत आहे. त्यात लोकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. त्यांची बाजू उचलून उचलून धरत खासदार राणे यांनी पुन्हा आक्रमक पवित्र घेतला आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री ठाकरे यांना लक्ष करण्याची संधीही त्यांनी साधली.

ट्वीट द्वारे मुख्यमंत्री यांच्यापुढे प्रश्न उपस्थितीत केले असून त्याची उत्तरे ही मागितली आहेत. ते म्हणाले, राज्यातील ही परिस्थिती कधी, कशी आणि कोण बदलणार? राज्यातील गोरगरीबांची उपासमार कधी थांबणार? उदयोगधंदे सुरु होऊन बेकारी कशी कमी होईल. याबद्दल कधीतरी मुख्यमंत्र्यांनी बोलावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SCROLL FOR NEXT