Mahendra Dalvi Sakal
कोकण

खासदार सुनील तटकरे यांनी स्वतःचे कुटुंब सोडून दुसरा कुणाचाच विकास केलेला नाही

खासदार सुनील तटकरे यांच्या सोबत मी काही वर्षे काम केले आहे. त्यामुळे मला त्यांच्या बद्दल माहिती आहे. तटकरे यांनी स्वतःचे कुटुंब सोडून दुसरा कुणाचाच विकास केलेला नाही.

अमित गवळे

पाली - खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांच्या सोबत मी काही वर्षे काम केले आहे. त्यामुळे मला त्यांच्या बद्दल माहिती आहे. तटकरे यांनी स्वतःचे कुटुंब (Family) सोडून दुसरा कुणाचाच विकास (Develop) केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवायला मागत नाही आहे. अशी स्पष्टोक्ती शुक्रवारी (ता.17) शिवसेना आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी पाली पंचायत समिती निवडणूक प्रचार सभेत केली.

ते म्हणाले की, सुनील तटकरे यांनी अनेक पक्षांचे कार्यकर्ते घेण्याचा प्रयत्न केला. काही गेलेही, मात्र 2-4 दिवसांत परत स्वगृही आले. कारण तटकरे यांच्यावर आता कोणी विश्वास ठेवायला मागत नाही आहे. एकेकाळी सुनील तटकरे यांचे कार्ड चालायचे पण आता ते बंद झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शेकाप यांना एकत्र यावे लागले हीच त्यांची हार आहे. असे मी समजतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी व्हावी यासाठी राष्ट्रवादी सोबत मंत्री व नेत्यांची प्रदीर्घ चर्चा झाली मात्र त्यातून काही निघाले नाही. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वार्थच दिसत होता. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने एकला चलो ची भूमिका घेतली. असे आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT