MP Vinayak Raut criticize on bjp kokan political marathi news 
कोकण

केंद्राच्या पथकावर काडीमात्र विश्वास नाही; चक्रीवादळावरुन शिवसेनेचे टीकास्त्र

राजेश कळंबट्टे

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाच्या (Tauktae Cyclone) पाहणीसाठी आलेल्या केंद्राच्या पथकावर माझा काडीमात्र विश्वास नाही. निसर्ग चक्रीवादळाच्यावेळी आलेल्या केंद्रीय पथकाने कोकणवासियांच्या तोंडाला पाने पुसली. आताही तौक्ते चक्रीवादळाशी संघर्ष करुन कोकणातील जनता स्थिरस्थावर झाल्यावर हे केंद्रीय पथक पाहणीकरीता आले. हे पथक पाहणी करुन काय अहवाल देणार, असा प्रश्न शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut)यांनी उपस्थित केला आहे. खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी तालुक्यातील कोविड केअर आयसोलेशन सेंटरला भेट दिली. त्यापूर्वी ते रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते. (mp-vinayak-raut-criticism-on-central-squad-kokan-cyclone-marathi-news)

केंद्रीय पथकाने नुकताच जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. याबाबत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळाच्यावेळी पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाने कोकणवासियांच्या तोंडाला पाने पुसली. आता आलेलं शिष्टमंडळही तसंच आहे. आता तौक्ते चक्रीवादळाशी संघर्ष करुन कोकणातील जनता स्थिरस्थावर झाली. राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने त्यांचं जीवन सुरळीत केलं. त्यामुळे आता आलेल्या समितीला काही दिसलं नाही तर तसे ते रीमार्क देणार, आणि त्याचा फार काही फायदा होईल असं मला वाटत नाही.

तौक्ते चक्रीवादळाची पाहणी करायला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात आलेले केंद्रीय पथक खूप उशीरा आले. राज्यसरकारने नुकसानीची पाहणी करुन मदतही जाहीर केली. त्यानंतर केंद्रीय पथक येऊन काय पाहणी करणार, लोक आता स्थिरस्थावर झाले आहेत, हे पाहून केंद्रीय पथक काय अहवाल देणार ते लक्षात आल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT