mseb good work in kokan 
कोकण

चक्रीवादळात महावितरणचा दिवा ; 50 दिवसांत 628 गावे पुन्हा प्रकाशली

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - आजवर “वावटळीत दिवा लावणे” हा वाक्यप्रचार आपण ऐकतं आलोय. पण उद्या भविष्यात कोणी ‘चक्रीवादळात महावितरणचा दिवा’ असा शब्दप्रयोग केला तर नवल वाटायला नको. कारण तस कामचं या कंपनीने केलं आहे. तेही कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात.

त्याचं झालं असे की, 3 जून रोजी कोकण किनारपट्टीला ‘निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. या तडाख्यात वीज वितरण कंपनीची यंत्रणा अक्षरश: भुईसपाट झाली. 47 उपकेंद्रे बंद पडली. 5708 रोहित्र जमीनदोस्त झाली. परिणामी रत्नागिरी जिल्ह्यातील 628 गावांचा वीजपुरवठा ठप्प झाला. गुहागर, मंडणगड व दापोली या तीन तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला. एकप्रकारे अर्धा जिल्हाच अंधारात गेला होता. त्यात कोकणात व विशेष करुन चक्रीवादळ बाधित भागात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाला होता.

चक्रीवादळ येण्यापूर्वी म्हणजे 22 मार्चपासून जनता घरात होती. त्यांना घरात थांबविण्यासाठी अखंडीत वीजपुरवठा ठेवण्याचे काम महावितरणचे ‘कोरोना योद्धे’ करत होते. या जागतिक संकटाचा मुकाबला सुरू असतानाच ‘निसर्ग’ ने दणका दिला. जिथे नागरिकांनी घरात थांबणे आवश्यक होते. तिथे निसर्गाने त्यांचे घरच हिरावून घेतले.

हा विस्कटलेला संसार पुन्हा उभा करण्यसाठी सर्वप्रथम वीजपुरवठा सुरळीत होणे आवश्यक होते. त्यासाठी महावितरणने जे नियोजन युध्दपातळीवर केले ते कौतूकास्पद आहे. वादळाच्या दुसऱ्याच दिवशी ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत, महावितणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे, कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. गोविंद बोडके, संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू यांनी रायगड जिल्हा दौरा करून संपूर्ण कोकणातील वीजपुरवठ्याचा आढावा घेतला. त्यांनी त्याच दिवशी आदेश देऊन सबंध महाराष्ट्रातून कोकणाच्या मदतीला अतिरिक्त कूमक पाठवली. रोहित्र व वीजखांबासह विविध साहित्यही मुबलक प्रमाणात पाठविले. शिवाय आलेली पथके त्यांना लागणाऱ्या साधनसामुग्रीसह आली. मदत पथकापुढे कामासोबत तिथे जाणे, विलगीकरण, जिल्हाबंदी यांसह अनेक आव्हाने होती. या सर्व आव्हानांना तोंड देऊन महावितरणच्या या कोरोना योध्द्यांनी कोकणाला अवघ्या 50 दिवसांत अंधारातून बाहेर काढले.

काम सोपे नव्हते - आज एक पोल उभा करायचा असेल तर किमान दहा ते पंधरा व्यक्तिंच्या सहकार्याची गरज पडते. त्यात हे पोल डोंगरदऱ्यातून, कोकणाच्या मुसळधार पावसात वाहतूक करून जागेवर पोहोचवणे हे सुध्दा एक आव्हानच होते.

गावकऱ्यांची मोलाची मदत - या संपुर्ण कामात वीज कर्मचाऱ्यांना स्थानिक कोकणी माणसांची मोलाची मदत मिळाली. ही यंत्रणा उभी करण्यात त्यांचाही मोठा वाटा आहे. अनेक ठिकाणी चहापानाची व्यवस्थाही या सर्वांनी मोठ्या आपुलकीने केली म्हणूनच हे अवघड काम बाहेर जिल्ह्यातून आलेल्या कामगार मंडळींनीही आनंदाने केले. त्यातील अनेकांना त्यांच्या जिल्ह्यात परतल्यावर विलगीकरणातही जावे लागले. 

628 गावे पुन्हा प्रकाशली

बाधित झालेली सर्व 47 उपकेंद्रे व 628 पैकी 500 गावे 15 जूनला सुरु झाली. वीजपुरवठा सुरुळीत करताना आधी उच्चदाब वाहिन्या व त्यानंतर लघुदाब वाहिन्यांना प्राधान्य देण्यात आले. उर्वरित गावे सुरु करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कर्मचारी काम करत होते. काम करताना पावसाशी व न दिसणाऱ्या कोरोनाशीही लढत होते. 25 जुलै रोजी सर्व गावे सुरु झाली. त्यासाठी या 50 दिवसांत तब्बल 9187 विजेचे खांब 5697 रोहित्रे उभे करावी लागली. हे काम एवढे सोप्पे नव्हते.

सांघिक नियोजन

रत्नागिरी परिमंडलाच्या मुख्य अभियंता सौ. रंजना पगारे, अधीक्षक अभियंता श्री. देवेंद्र सायनेकर सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय व शाखा अभियंते, इतर अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात तळ ठोकून राहिले. कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी, साहित्याचा पुरवठा, वाहने, त्यांची जेवणाची, आरोग्याची व राहण्याची व्यवस्था चोख ठेवली. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने कामावर जाताना व आल्यावर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जात होती. त्यामुळे जनमित्रांनी कोरोनाचे व ‘निसर्ग’चे दुहेरी आव्हान परतून लावले. 

सिंधुदूर्गात ‘निसर्ग’चा तडाखा कमी

रायगड, रत्नागिरीच्या तुलनेत सिंधुदूर्ग जिल्ह्याला निसर्गचा फारसा तडाखा बसला नाही. तरीही या सिंधुदूर्ग जिल्ह्यात सुमारे 400 वीजखांब जमीनदोस्त झाल्याने 166 गावांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. 7 जून रोजी हा सर्व बाधित वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सिंधुदूर्गचे अधीक्षक अभियंता श्री. विनोद पाटील व त्यांच्या सर्व टीमने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Nagar Parishad Election : बारामतीत जय पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची मागणी......

Train food vendor beat passenger Video : ‘’जेवण फार महाग आहे’’, एवढंच म्हटलं तर प्रवाशाला रेल्वेतच विक्रेत्यांनी पट्टा काढून बेदम मारलं!

Latest Marathi News Live Update : अवकाळी पावसामुळे मिळालेल्या मदतीची रक्कम वजा करून मदत दिली जात - संजय पाटील घाटणेकर

पिंम्पल्स असलेली हिरोईन आम्ही का पाहायची... शिवानीला झालेल्या ट्रोलिंगवर अमित म्हणतो- तिच्या चेहऱ्यावर लिच लावले...

Tomorrow Horoscope Prediction : उद्या तयार होतोय अत्यंत शुभ सर्वार्थ सिद्धी योग, 5 राशींवर भगवान विष्णूची कृपा

SCROLL FOR NEXT