msrtc 52 contract employees of ST will face unemployement ratnagiri
msrtc 52 contract employees of ST will face unemployement ratnagiri  esakal
कोकण

ST News : एसटीच्या ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात

- राजेश शेळके

रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी एसटी महामंडळाने करार पद्धतीने राज्यात ८०० चालक-वाहकांची नियुक्ती केली होती. यामध्ये जिल्ह्यातील ५२ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. शासनाने २ तारखेला हा करार संपुष्टात आणला. जादा चालक, वाहकांची गरज नसल्याने पुन्हा करार केला जाणार नसल्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या व महामंडळाच्या गरजेच्या वेळी धावून आलेल्या जिल्ह्यातील ५२ कर्मचाऱ्यांसह राज्यातील ८०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

महामंडळाच्या तिजोरीतही खडखडाट असल्याने आगामी दसरा-दिवाळीच्या सणासुदीला कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जवळपास ५ महिने संप केला होता. एसटीचा हा ऐतिहासिक संप ठरला. त्यानंतर तत्कालीन सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतर संप मागे घेण्यात आला होता. ठाकरे सरकारने विलीनीकरणाची मागणी वगळता बाकी मागण्या मान्य करत एसटी कर्मचाऱ्यांची भरघोस वेतनवाढ दिली होती. तसेच नियमित वेतन व महामंडळाला आर्थिक मदतीची घोषणाही केली होती. न्यायालयाने यात हस्तक्षेप करून संपकऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कर्मचारी कामावर हजर होऊन एसटी पुन्हा सुरू झाली. आता शिंदे सरकारच्या काळात पुन्हा वेतनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

भविष्य निर्वाह निधी रखडला

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पूर्ण पैसे न दिल्यामुळे पुढील महिन्यात पगार करायचे कसे, असा प्रश्न महामंडळासमोर निर्माण झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे येणाऱ्या दसरा, दिवाळी या सणासुदीच्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाने पैशाअभावी मागील २ महिन्यांपासून ९० हजार कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा हप्ताही जमा केला नसल्याचेही समजते.

संपकाळात करारावर घेतलेल्या जिल्ह्यातील ५२ चालक-वाहकांचा करार २ तारखेला संपुष्टात आला आहे. करार वाढविण्याबाबत महामंडळाचा कोणताही निर्णय नसल्याने सध्या तरी ५२ कर्मचाऱ्यांचे काम बंद आहे.

- प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, एसटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT