Narayan-Rane
Narayan-Rane 
कोकण

भाजपप्रवेश आठ दिवसांत - राणे

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - युती होवो किंवा न होवो, त्याचा माझ्या भाजपप्रवेशाशी काही संबंध नाही. येत्या आठ दिवसांत माझा प्रवेश निश्‍चित आहे. तसा शब्द मला मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी दिला असल्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ‘नाणार’बाबत माझी भूमिका भाजपमध्ये गेल्यावर स्पष्ट करेन. त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या भाषेला उत्तर देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राणे यांनी येथील श्रीराम वाचन मंदिर सभागृहात तालुक्‍यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या वेळी त्यांनी आपल्या भाजपप्रवेशाबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

राणे म्हणाले, ‘गेले तीन दिवस मी जिल्ह्याचा दौरा करीत आहे. आगामी भाजपप्रवेशाबाबत कार्यकर्त्यांना अज्ञानात ठेवून निर्णय घेणे मला उचित वाटले नाही. यासाठी त्यांच्याशी संवाद साधत आहे. ज्याप्रमाणे आपण मला आतापर्यंत साथ दिली, तशीच साथ भविष्यातही मिळावी, असे कार्यकर्त्यांना सांगितल्यावर ‘जेथे तुम्ही तेथे आम्ही’ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. शेवटपर्यंत ते माझ्यासोबत असतील.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT