politics
politics esakal
कोकण

'नांदा सौख्य भरे'! राणेंनी दिला अध्यक्ष, उपाध्यक्षांना आशीर्वाद

विनोद दळवी

ओरोस : अपेक्षेप्रमाणे भाजपचे मनीष दळवी अध्यक्षपदी तर अतुल काळसेकर उपाध्यक्षपदी ११ विरुद्ध ७ मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली खुर्चीवर विराजमान झाले आहेत. निवडीनंतर राणे यांनी स्वतः जिल्हा बँकेत येत नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या.

पूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. भाजपची सत्ता आल्याने मंत्री राणे कोणाला संधी देतात ? याकडे लक्ष लागले होते. मात्र, नितेश राणे यांचे अत्यंत विश्वासू मनीष दळवी यांचे नाव अध्यक्ष पदासाठी जाहीर करतानाच उपाध्यक्षपदी जुने भाजप पदाधिकारी अतुल काळसेकर यांचे नाव जाहीर केले होते. त्यानुसार या दोघांनी अर्ज दाखल केले. मात्र, महाविकास आघाडीकडून अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या व्हिक्टर डांटस तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या सुशांत नाईक यांनी उमेदवारी दाखल केल्याने निवडीतील चुरस वाढली होती.

सहकार निवडणूक निर्णयानुसार निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांनी गोपनीय पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवली. यावेळी भाजपच्या दोन्ही उमेदवारांच्या बाजूने अकरा तर महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या बाजूनं सात मते पडली. महाविकास आघाडीच्या संचालक नीता राणे अनुपस्थित राहिल्याने त्यांचे एक मत कमी झाले. यानंतर पीठासीन अधिकारी वंदना खरमाळे यांनी अध्यक्षपदी मनीष दळवी तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड जाहीर केली.

निकाल जाहीर होताच भाजपने फटाक्यांची आतषबाजी सुरू केली. तर नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे जंगी स्वागत सुरू केले. केंद्रीयमंत्री नारायण राणे स्वतः बँकेत दाखल होत या दोन्ही पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत "नांदा सौख्य भरे" असा आशीर्वाद दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT