narayan rane medical college inauguration amit shah
narayan rane medical college inauguration amit shah 
कोकण

नारायण राणे यांच्या मेडिकल काॅलेजच्या उद्घाटनासाठी अमित शाह येणार सिंधुदुर्गला 

विनोद दळवी

ओरोस - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा ६ फेब्रूवारी रोजी दुपारी १ वाजून ५० मिनिटानी सिंधूदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथे हेलीकॉप्टरने येत आहेत. खास नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करण्यासाठी शहा येत असून यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते विनोद तावडे, आशीष शेलार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
 

पडवे येथील एस. एस. पी. एम. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे आयोजित पत्रकार परिषदेला आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, कुडाळचे माजी नगराध्यक्ष विनायक राणे, नगरसेवक राकेश कांदे, संतोष वालावलकर आदी  उपस्थित होते. 

 'मेडिकल कॉलेजला १५० विद्यार्थी प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. १५ जानेवारी रोजी प्रवेश मुदत संपली. प्रवेश पहिल्याच फेरीत पूर्ण झाले असून २२५ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारावा लागला असल्याचे सांगून शहा यांच्या दाैऱ्याबद्दल सांगतना राणे म्हणाले, ६ फुब्रुवारीला दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी अमित शहा मेडिकल कॉलेज येथे येणार आहेत. २ वाजून १० मिनिटांनी मेडिकल कॉलेजचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

एक तासभर ते येथे थांबणार आहेत. कॉलेजच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार असून यावेळी विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील भाजप नेते त्यांचे स्वागत करणार आहेत. हा कार्यक्रम संपला की ते हेलीकॉप्टरने गोव्याला  जाणार आहेत.  

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT