National Song Compulsion In Colleges Sindhudurg Marathi News
National Song Compulsion In Colleges Sindhudurg Marathi News  
कोकण

महाविद्यालयांमध्ये आता राष्ट्रगीत सक्तीचे 

सकाळवृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) - राज्यातील अभियांत्रिकी डी फार्मसी, आर्किटेक या महाविद्यालयमध्ये राष्ट्रगीत म्हणणे सक्तीचे केले आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी तसे परिपत्रक जारी केले आहे. याला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दुजोरा दिला आहे. 

राज्यातील प्राथमिक शाळेपासून वरिष्ठ महाविद्यालयापर्यंत राष्ट्रभावना जागृत व्हाव्यात, या उद्देशाने महाविद्यालयांमध्ये सुद्धा प्रथम राष्ट्रगीताने दिवसाच्या शैक्षणिक कामकाजाला सुरवात होणार आहे. याबाबतचे परिपत्रक 30 जानेवारीला पाठविले आहे. राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय, वास्तुविशारद महाविद्यालये, डी फार्मसी आणि बी फार्मसी अशा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत सादर करूनच आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमाची सुरवात दररोज करावी लागणार आहे.

सध्या प्राथमिक माध्यमिक स्तरावर किंबहुना काही महाविद्यालयांच्या उच्च माध्यमिक स्तरावर "जन गण मन' हे राष्ट्रगीत गायले जाते. शाळा आणि उच्च महाविद्यालय जेथे जोडण्यात आलेली आहेत. अशा ठिकाणी हे राष्ट्रगीत म्हटले जाते; मात्र उच्च माध्यमिक ते उच्च महाविद्यालय अशा शैक्षणिक संकुलांमध्ये राष्ट्रगीत म्हटले जात नाही, ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर आता देशभावना जागृत व्हावी या उद्देशाने राष्ट्रगीत सक्तीचे केले आहे. तरुणपिढी अलीकडे तंत्रज्ञानाच्या मागे धावत असून भारतीय संस्कृतीचा पाया विसरू लागली आहे. त्यातच तरुणांच्या मनात विष कालवण्याचा प्रकार काही संघटनांकडून होत आहे. त्यामुळे भरकटणाऱ्या तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम संस्कृती जतन करण्यासाठी शाळा महाविद्यालयातच राष्ट्रप्रेम शिकवण्याची गरज आहे. याच उद्देशाने देशातील पहिले राज्य म्हणून महाराष्ट्रात महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रगीत म्हणण्याची परंपरा सुरू होत आहे. 

महाविद्यालयांचे फलक मराठी भाषेत 

सर्व महाविद्यालयांना आपले फलक मराठीमध्येच लावावे, अशी सूचना करून तसे परिपत्रक काढले आहे. मातृभाषेचे प्रेम असले पाहिजे ही त्यामागे भावना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनेक चांगले निर्णय घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयांमध्ये सुरवातीस राष्ट्रगीत म्हटले पाहिजे, असे परिपत्रक काढण्यात आल्याचे उच्च शिक्षण मंत्री सामंत यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT