new species of flower in konkan named as vikram gokhale contribution of five professors in ratnagiri 
कोकण

‘विकोआ गोखलेई’ नव्या जागतिकस्तरीय फूल वनस्पतीचा शोध!

राजेंद्र बाईत

राजापूर (रत्नागिरी) : जैवविविधततेने नटलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये विविध दुर्मिळ आणि प्रदेशानिष्ट अशा मोठ्याप्रमाणात वनस्पती आढळतात. त्यामध्ये आता जागतिकस्तरीय नव्या फुलवनस्पतीची भर पडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्‍चंद्र गड परिसरामध्ये ‘विकोआ गोखलेई’  या नव्या फुलवनस्पतीचा शोध लागला आहे. ही फूलवनस्पती सूर्यफूल कुळातील असून मराठीमध्ये त्याला ‘सोनसरी’ असे म्हणतात.

गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच. पी. टी. आर्टस व आर. वाय. के. सायन्स महाविद्यालय, नाशिक येथील वनस्पती शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुमार विनोद गोसावी, त्यांचे संशोधक विद्यार्थी निलेश माधव, रयत शिक्षण संस्थेच्या राजापूर तालुक्‍यातील आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे वनस्पती शास्त्राचे सहायक प्राध्यापक डॉ. अरुण चांदोरे, त्र्यंबकेश्‍वर (नाशिक) येथील महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. शरद कांबळे, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे वनस्पतीशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रीरंग यादव यांनी दोन वर्षाच्या संशोधनानंतर या नव्या फूल वनस्पतीचा शोध लावला आहे.  

हरिश्‍चंद्र गड व परिसरातील वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी फेरफटका मारीत असताना डॉ. गोसावी आणि सहकाऱ्यांनी नावीण्यपूर्ण असणारी ही फूलवनस्पती त्यांच्या नजरेस पडली. तिच्याबद्दल कुतूहल वाटल्याने त्याच्याविषयी माहिती जाणून घेतली असता, ही नवीन प्रजाती असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर फुले, पाने, बिया यांचा आकार, रंग अशा विविध भागांचा सखोल अभ्यासअंती विकोआ गोखलेई ही वनस्पती तिच्या प्रजातीपेक्षा भिन्न असल्याचे स्पष्ट झाले. त्यातून, या वनस्पतीचे संशोधन आणि अभ्यास केला असता, या नव्या फुलवनस्पतीचा शोध लागला.

‘विकोआ गोखलेई’  या फूलवनस्पतीची संशोधित वनस्पती म्हणून जागतिक स्तरावर १७ नोव्हेंबर, २०२० रोजी न्यूझिलंड येथून प्रकाशित होणाऱ्या फायटोटॅक्‍सा या जागतिक दर्जाच्या या नियतकालिकाच्या माध्यमातून नोंद झाली आहे. या संशोधनास गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच. पी. टी. व आर. वाय. के. महाविद्यालय, नाशिकचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सुर्यवंशी, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संजय आवटी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  

असे झाले नामकरण 

नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटी ही नामांकित आणि शेकडो वर्षापेक्षा जास्त शैक्षणिक वारसा असणारी ज्ञानगंगा आहे. संस्थेचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेवून या नव्या जागतिकस्तरीय फुलवनस्पतीस नाशिकच्या या शिक्षणसंस्थेचे नाव दिले आहे.

फूल वनस्पतीची वैशिष्ट्ये..

- सूर्यफूल कुळातील वनस्पती       

- मराठीमध्ये सोनसरी नामकरण

- पश्‍चिम घाट परिसरात आढळ       

- झाडाची १ ते ४ फूट उंची       

- हिरवी पाने, गर्द पिवळी फुले      

- सोनसरीच्या जगामध्ये १४ प्रजाती

- ऑक्‍टोबर ते जानेवारीपर्यंत फुलांचा बहर    

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT