कोकण

कोकणात कोरोनाच्या नवीन स्टेनचा शोध सुरु; मंत्री सामंतांनी दिली माहिती

राजेश कळंबटे

रत्नागिरी : कोरोनाचा नवीन स्टेनचा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसार होतो का याची तपासणी करण्याच्या सुचना आरोग्य विभागाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार संगमेश्‍वर तालुक्यातील 'ती' पाच गावे कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केली गेली, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाप्रमाणे आदेश काढून प्रशासनाने संगमेश्वर तालुक्यातील धामणी, नावडी, म्हाभळे, कसबा, कोंडगाव या गावापासून 3 किलोमीटर परिसर कोरोना बाधित क्षेत्र घोषित केले. याला ग्रामस्थांचा विरोध झाला. याबाबत पत्रकारांशी चर्चा करताना मंत्री सामंत म्हणाले, राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे कोकणासह सातारा, कोल्हापूर येथील जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधला. उर्वरित महाराष्ट्रापेक्षा या पाच जिल्ह्यांमध्ये वेगळा स्टेन असण्याची शक्यता वर्तवली होती. त्यादृष्टीने राज्याच्या आरोग्य विभागाकडून पावले उचलली आहेत.

ब्रीटनमध्ये सापडलेल्या डेल्टा स्टेनप्रमाणे कोरोनाचा वेगळा स्टेन आढळण्याची शक्यता लक्षात घेऊन तपासणी सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून संगमेश्‍वर तालुक्यातील धामणी, नावडी, म्हाभळे, कसबा, कोंडगाव ही पाच गावे कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केली. या भागात परदेशातून 30 ते 35 जणं आले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली. ते बरे झाल्यानंतर मुंबईकडे रवाना झाले. त्यातील एकाला पुन्हा कोरोनाची लक्षणे आढळली. त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासण्या सुरु आहेत. पुढील चौदा दिवस लक्ष ठेवल्यानंतर आणि सरसकट तपासण्या केल्यावरचा त्याचा निर्णय होणार आहे. काही स्वॅब पाठविले असून त्याचा अहवाल आलेला नाही.

ते पुढे म्हणाले, तिसर्‍या लाटेला निमंत्रण देणारा विषाणू आपल्याकडे येण्याची भिती आहे. नवीन विषाणू आहे की नाही याची चाचपणी सुरु आहे. त्यासाठी येथील स्वॅब ‘एम्स’कडे पाठविले आहेत. आवश्यकता भासल्यास ते हे कडे पाठवले जातात. दुसरी लाट अमरावती, विदर्भामधून अवघ्या महाराष्ट्रात पसरली होती. तिसरी कोकणातून किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून सुरु होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणा काळजी घेत आहे.

कोरोनोच बाधित वाढत असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे 21 जुनला रत्नागिरी दौर्‍यावर येत असून त्यांच्याबरोबर आरोग्य मंत्री राजेश टोपे आहेत. ते जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही संदर्भात निर्णय घेतली. यावेळी महिला रुग्णालयातील ऑक्सीजन प्लांटचे लोकापर्ण करण्यात येणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT