New Talathi And Revenue Board Start In Kudal And Malvan Taluka  
कोकण

कुडाळ, मालवण तालुक्यात विविध ठिकाणी तलाठी सजांसह महसूल मंडळांची निर्मिती

सकाळवृत्तसेवा

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत तत्कालीन पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून व आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून येथील तालुक्‍यात 23 व मालवण तालुक्‍यात 12 तलाठी सजांची व दोन्ही तालुक्‍यात मिळून 6 महसूल मंडळांची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे नागरिकांना आता सातबारा व इतर कामासाठी सोयीचे होणार आहे. तलाठ्यांवरील ताणही कमी होणार आहे. 

कुडाळ, मालवण तालुक्‍यांची भौगोलिक परिस्थिती 7/12 ची संख्या, लोकसंख्या, महसुली गावातील वाड्यांची संख्या विचारात घेऊन जिल्ह्याकरिता निश्‍चित केलेल्या नियमांचा विचार करून तलाठी सजांची पुनर्रचना केली आहे. जिल्ह्यातील विखुरलेली भौगोलिक स्थिती त्यातच अनेक गावासाठी एक तलाठी सजा असल्याने सातबारा, दस्त व इतर कामासाठी लोकांची हेळसांड होत होती. एका तलाठी सजावर अनेक गाव अवलंबून असल्याने तलाठ्यांवरही कामाचा ताण होत आहे. त्यामुळे लोकांची कामे होण्यास विलंब होत होता. ही बाब लक्षात घेऊन आमदार नाईक यांनी नवीन तलाठी सजा, नवीन महसूल मंडळे होण्यासाठी पालकमंत्री, खासदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

त्यानुसार मालवण तालुक्‍यामध्ये सुकळवाढ, चौके, चाफेखोल, खोटले, बेलाचीवाडी, असगणी, आडवली, बुधवळे, पळसंब, आचरा गाऊडवाडी, सडेवाडी, किर्लोस आणि कुडाळ तालुक्‍यात वर्दे, रानबांबुळी, गुढीपुर, बांबर्डे तर्फ माणगाव, आंबडपाल, पणदूर, आकेरी, घाटकर नगर, जांभरमळा, गोवेरी, हुमरमळा, मानकादेवी, सोनवडे तर्फ कळसुली, आवळेगाव, तुळसुली क नारुर, कट्टागाव, केरवडे क नारुर, नमसगाव, शिवापूर, कुंदे, देऊळवाडी, कुपवडे, खुटवळवाडी या गावांमध्ये तलाठी सजांची पुनर्रचना करण्यात आली आहे. 

नवीन महसूल मंडळे... 
कुडाळ आणि मालवण तालुक्‍यात ओरोस बुद्रुक, गोठोस, झाराप, मडगाव, सुकळवाड, कोळंब या सहा ठिकाणी नवीन महसूल मंडळांची निर्मिती केली आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT