new year celebration time limit konkan sindhudurg 
कोकण

जल्लोषाला यंदा "टाईम लिमिट' 

नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी -  सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष रात्री 11 पर्यंत उरकावा लागणार आहे. गृह विभागाने यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रात्री 11 नंतर जिल्ह्यात संचारबंदी लागू होणार आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थर्टी फस्टचा जल्लोष साजरा कसा करावा? याबाबत गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वर्षाला निरोप आणि नूतन वर्षाचे स्वागत करताना रात्री 10 पर्यंत मद्य विक्री व हॉटेल सुरू राहणार असून 11 नंतर संचारबंदी लागू होणार आहे. फटाक्‍यांच्या आतषबाजीवर बंदी असून धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही. 

गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार नागरिकांना घरीच नववर्षाचे स्वागत करावे लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी न करता नियमाचे पालन करावे. माक्‍सचा वापर करावा. 60 पेक्षा जास्त वय असलेले नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांनी घराबाहेर पडू नये. धार्मिक स्थळावर गर्दी करू नये.

ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने नियमाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय तसेच खासगी रुग्णवाहिकांची सेवा, रात्रीच्या वेळेस सुरू राहणारी औषधाची दुकाने, पेट्रोल पंप व भाजीपाला विक्री, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या डेरी, रेल्वेने तसेच एसटी बस व खासगी वाहनाने उतरणाऱ्या प्रवाशांकरिता ऑटोरिक्षा यांना संचारबंदीच्या कालावधीत मुभा राहणार आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT