newly dig borewell at Kokare Ghanekarwadi hot springs kokan marathi news 
कोकण

अन् वाहू लागले बोअरवेलला गरम पाणी

नागेश पाटील

चिपळूण (रत्नागिरी) :  तालुक्‍यातील कोकरे घाणेकरवाडी येथे नव्याने खुदाई केलेल्या बोअरवेलला गरम पाण्याचे झरे लागले आहेत. मंगळवारी (ता.30) रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. जमिनीपासून सुमारे 5 फुट उंचीपर्यंत 6 इंची पाईपमधून कुपनिलेकतून गरम पाणी बाहेर पडत आहे. कोकरे-घाणेकरवाडी येथील संजय दळवी यांच्या शेतात मारलेल्या बोअरवेलच्या ठिकाणी हा प्रकार घडला असून पाहणीसाठी लोक धाव घेत आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली व राजवाडी, दापोली तालुक्‍यातील उन्हवरे येथे गरम पाण्याची कुंडे आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या कुंडामध्ये गमर पाण्याचा प्रवाह अखंडपणे वाहत आहे. उन्हाळ्यातील पाणी टंचाईमुळे कोकरे-घाणेकरवाडी येथील संजय दळवी शेतात बोअरवेल मारत होते. सायंकाळी 6 वाजता बोअरवेलचे काम सुरू झाले. रात्री 11 च्या सुमारास गरम पाण्याचे फवारे बाहेर पडू लागले.

अगदी उकळल्यासारखे हे पाणी आहे. काही महिन्यापूर्वी खेरशेत येथे बोअरवेल खोदाई करताना गरम पाणी लागले होते. मात्र गरम पाण्याचे प्रमाण कमी होते. दळवी यांनी 175 फुट बोअरवेल खोदाई केली आहे. 6 इंची पाईपने गरम पाणी भरून बाहेर पडत आहे. ही घटना पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होऊ लागली आहे. गरम पाण्याचे झरे वाहू लागले आहेत. संबंधित शासकीय अधिकारी व भुगर्भ शास्त्रज्ञांनी घटनास्थळी भेटी दिलेल्या नाहीत.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT