कोकण

पैसेवाल्यांनाच सेनेत पदे - नीलेश राणे

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी -‘शिवसेनेत फक्‍त ‘गांधीजी’ चालतात. पैसे आहेत, त्यांन्याच पद दिले जाते. जुने शिवसैनिक वेगळेच होते. त्यांना प्रणाम करावासा वाटतो. त्यामुळे कोणीही चालेल; पण शिवसेनेचा उमेदवार २०१९ मध्ये निवडून येणार नाही, अशी शपथ मी घेतली आहे. यादृष्टीने आखणी केली आहे,’ असे मत माजी खासदार नीलेश राणे यांनी व्यक्त केले.

येथील मराठा मंडळ सभागृहात झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी त्यांनी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत यांच्यासह शिवसेनेला लक्ष्य करताना आमदार जाधवांच्या भेटीतही राजकारण असल्याचा आरोप केला.

ते म्हणाले, ‘‘माझा कोणावरही वैयक्‍तिक राग नाही; मात्र विकासकामात आडवे आलेल्यांना धडा शिकवणार. राणे नकोत म्हणून सगळे कावळे सध्या एकत्र झाले आहेत. खासदार राऊतांसह सर्वच जण आमदार भास्कर जाधवांच्या घरी गेले. तेथेही चर्चा झाली, ती राजकीय. तब्येत विचारायला गेलेल्या राऊतांकडून ही अपेक्षा नव्हती. बाळासाहेबांबद्दल नको ते बोलणाऱ्यांना पायघड्या घालत ते फिरत आहेत. ते पदासाठी वाट्टेल ते करतील.’’ 

ते म्हणाले, ‘‘गेली २५ वर्षे शिवसेना जिल्ह्यात सत्तेत आहे. खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य त्यांचेच; पण विकास झाला नाही. आरोग्याची स्थिती गंभीर आहे. नारायण राणेंनी स्वतःच्या खिशातून सिंधुदुर्गात रुग्णालय काढले. ते इकडील पैसेवाल्या नेत्यांना जमले नाही. महामार्ग चौपदरीकरणाचे काम रत्नागिरीतच रखडले. आमदारांच्या केसांमध्ये बदल झाला; पण मतदारसंघ तसाच आहे. सहा महिन्यांनी लोकसभा निवडणुका लागत आहेत. त्यांसाठी सर्वांनी सज्ज राहा.’’

...त्या भाषेतच उत्तर देऊ
समोरच्याला ज्या भाषेत कळते, त्या भाषेतच उत्तर देण्याची सवय आहे. त्यानुसार चार दिवस शिवसेनेला सळो की पळो केले. तेव्हा शाखा बंद पाडायला लावल्या. मी कोठे जातो याचीच चर्चा होती. ही खरी राणेंची ताकद आहे. काँग्रेसमध्ये गार झालो होतो. आता ताकद दाखवू, असे त्यांनी ठणकावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT