कोकण

आणखी नऊ चेकपोस्ट सुरू करणार

सकाळवृत्तसेवा

बांदा - जिल्ह्यातील अंतर्गत कार्यरत असणारे १४ पोलिस तपासणी नाके हे बिनकामाचे असल्याने ते नाके बंद करून पोलिस कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका, तसेच गोवा राज्याच्या सीमेवरून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीच्या पार्श्‍वभूमीवर बांदा शहरासह वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्‍यात नव्याने नऊ पोलिस तपासणी नाक्‍यांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

अधीक्षक गेडाम हे बांदा पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी येथील पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलिसपाटील यांच्याशी देखील संवाद साधला. गावात कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसपाटील यांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांनी निवडणूक कालावधीत तत्पर राहावे, अशा सूचना दिल्यात. निवडणुकीच्या कालावधीत जिल्ह्यात होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीविरोधात पोलिस प्रशासन कडक पावले उचलणार असल्याचे निर्देश देखील त्यांनी दिलेत.

बांदा पोलिस ठाण्याचे काम जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यांच्या तुलनेत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच सर्वाधिक अंतर्गत तपासणी नाके आहेत. १९ तपासणी नाक्‍यांमुळे पोलिस कर्मचारी बिनकामाचे अडकले जात होते. त्यामुळेच पोलिस कर्मचारी यांच्यावरील ताण कमी करण्यासाठी १४ तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गोव्यातून जिल्ह्यात येताना चोरटी दारू वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्‍यात ९ तपासणी नाके नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. या नाक्‍यांसाठी लवकरच जागा निश्‍चित करण्यात येणार असल्याचे गेडाम यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात आडवाटेने होणाऱ्या दारू वाहतुकीवर आमची करडी नजर असून, सर्व पळवाटांवर आमचे पोलिस कर्मचारी नजर ठेवून असल्याचे गेडाम यांनी सांगितले.
यावेळी सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी मुळीक, बांदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर आदी उपस्थित होते.

१३ स्पीड बोटी कार्यरत 
सिंधुदुर्ग जिल्ह्याची सागरी हद्द सुरक्षित असून समुद्रमार्गे होणारी अवैध सागरी वाहतूक रोखण्यासाठी सागरी सीमेवर ६ पोलिस स्थानके व समुद्रात गस्तीसाठी एकूण १३ स्पीड बोटी कार्यरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT