bombs
bombs  
कोकण

रत्नागिरी : नऊ जिवंत गावठी बॉम्ब जप्त

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : वेंगुर्ले (जि. सिंधुदुर्ग) येथून रत्नागिरीत गावठी बॉम्ब (Bomb)विक्रीसाठी आलेल्या टोळीतील दोघांना दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नऊ जिवंत गावठी बॉम्ब जप्त केले आहेत. ते बॉम्बचे नमुने दाखविण्यासाठी रत्नागिरीत(Ratnagiri) आले होते. पसंत पडल्यावर मोठा व्यवहार होणार होता, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

वेंगुर्ले येथील रामा सुरेश पालयेकर (वय २२), श्रीकृष्ण केशव हळदणकर (२६, रा. गावडेश्वर मंदिर) हे दोघे काल (ता. १५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास वेंगुर्ले येथून दुचाकीने हातखंबा येथे आले होते. वेंगुर्लेतून दोन तरुण गावठी बॉम्ब घेऊन रत्नागिरीत येणार असल्याची माहिती जिल्हा दहशतवादविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी सहापासून पोलिसांनी हातखंबा येथे सापळा रचला होता. साडेसातच्या सुमारास पालीहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या एका दुचाकीला (एमएच- ०७- एपी- २७००) पोलिसांनी थांबविले. परंतु, दुचाकी चालक पळून जाण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत झडती घेतली. त्यांच्याकडे नऊ जिवंत गावठी बॉम्ब आढळले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ बॉम्बशोधक पथकाला पाचारण करून ते जिवंत बॉम्ब त्यांच्या ताब्यात दिले. या प्रकाराची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचानामा केला.(Ratnagiri News)

पोलिस हवालदार उदय चांदणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी रामा पालयेकर, श्रीकृष्ण हळदणकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

डुकरांच्या शिकारीसाठी...

बॉम्ब घेऊन आलेले तरुण रत्नागिरी तालुक्यात बॉम्बची मोठ्या प्रमाणात विक्री करणार होते. त्यापूर्वी नमुने म्हणून ते बॉम्ब दाखविण्यासाठी घेऊन आले होते. त्याचा वापर डुकरांच्या शिकारीसाठी केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Accident News: इगतपुरीच्या भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू; मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश

Bacchu Kadu vs Sachin Tendulkar : तर सचिन तेंडुलकरचा पुतळा जाळणार... बॉडीगार्डनं जीवन संपवल्यानंतर बच्चू कडूंनी साधला निशाणा

Silver Price Update : चांदीचे दर गगनाला भिडले! इराण अन् सौदीत टेन्शन वाढल्याने १ लाखाच्या वर जाणार किंमत

Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल कोण? किती आहे संपत्ती

Latest Marathi News Live Update : इगतपुरीच्या भावली धरणात 5 जणांचा बुडून दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT