no working of education officer in chiplun 1100 teachers salary not received 
कोकण

सहीला नाही कोणी वाली ; तब्बल ११०० शिक्षक पगाराविनाच!

नागेश पाटील

चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्‍यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या पगारापोटी लाखोंची रक्कम पंचायत समितीकडे जमा झाली आहे. मात्र, पगार बिलावर गट शिक्षणाधिकाऱ्यांची सही झालेली नाही. गट शिक्षणाधिकाऱ्याचा पदभार स्वीकारण्यास अधिकारी धजावत नसल्याने तालुक्‍यातील ११०० शिक्षकांचे पगार रखडले आहेत. यावरून तालुक्‍यातील शिक्षक संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.

चिपळूण पंचायत समितीच्या शिक्षण विभागात गेल्या काही दिवसांपासून प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचा खेळखंडोबा सुरू आहे. संबंधित ५ विस्तार अधिकाऱ्यांपैकी एकही जण गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारण्यास तयार नाही. ऑर्डर निघेल, याची गुप्त माहिती मिळताच अधिकारी रजेवर जाऊ लागले आहेत. चिपळूणात गटशिक्षणाधिकारीच कार्यरत नसल्याने तालुक्‍यातील ११०० शिक्षक कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. पगारासाठीचा निधी पंचायत समितीकडे जमा झालाय.

मात्र, शिक्षकांच्या पगार बिलावर गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या सह्याच होत नसल्याने शिक्षकांच्या खात्यावर वेतन वर्ग करता येत नाही. गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीच्या खेळखंडोबामुळे फाईलींचा ढिग पडून आहे. येथील शिक्षण विभागाचा डोलारा मोठा आहे. 
दाखले नाहीत, 

शंकाचे निरसन नाही

शिक्षकांना विविध कामकाजासाठी लागणारे दाखलेही रखडले आहेत. तालुक्‍यातून येणाऱ्या ग्रामस्थांच्या शंकाचेही निरसन होत नाही. गट शिक्षणाधिकारीच नसल्याने ग्रामस्थांच्या तक्रारीवर तोडगा काढता येत नाही. काही शाळेत विद्यार्थ्यांचा चांगला पट असूनही शिक्षकांची कमतरता आहे. अशा शाळेवर शिक्षकांची कामगिरी काढण्याची कामेही रखडत आहेत अथवा त्यावर तोडगा निघत नाही. 

"चिपळूण पंचायत समितीच्या शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीचा खेळखंडोबा सुरू असल्याने तालुक्‍यातील शिक्षकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते आहे. केवळ गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या पगार बिलावर सह्या झाल्या नसल्याने शिक्षकांची उपासमार सुरू आहे. यासाठी संघटना उद्या सभापती, गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. गट शिक्षणाधिकारी पदावर काय तो एकदाचा तोडगा काढा, अशी मागणी करणार आहोत."

- राजेंद्र महाडीक, तालुकाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ
 

अशी झाली परिस्थिती

  •      खात्यावर वेतन वर्ग करणे अडले 
  •      शिक्षकांचे विविध दाखलेही रखडले 
  •      ग्रामस्थांच्या तक्रारी तोडग्याविनाच
  •      शिक्षणविभागात फाईलींचा ढीग पडून

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT