crime case
crime case google
कोकण

सेल्फीनं घेतला जीव, हरिहरेश्वर समुद्रात बुडून पर्यटकाचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

हरिहरेश्वर येथील समुद्रात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे

सेल्फी घेताना अनेकांचा जीव गेला किंवा सेल्फी घेण बेतलं जीवावर अशा बऱ्याच बातम्या ऐकल्या असतील. सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन मृत्यू झाल्याच्या घटना वाढतच असताना तरुणाई अनेकवेळा स्टंटबाजीवाले फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करत असतात. अशावेळी अनेकांना जीव गमावावा लागतो. आताही अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

हरिहरेश्वर येथील समुद्रात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. फोटो काढताना एक महिला पर्यटक लाटाच्या जोरदार फटक्यामुळे समुद्रात पडली. महिलेला वाचवण्यासाठी दुसऱ्या पर्यटकाने पाण्यात उडी टाकली. महिला पर्यटकास वाचवण्यात तालुका प्रशासनास यश आले असले तरी पुरुष पर्यटकाला मात्र प्राण गमवावा लागला आहे.

अधिकची माहिती अशी की, विकास रामचंद्र काळे (वय 53) आणि मनिषा जयेश मेटे-दळे (वय 49) हे पुण्यातील पर्यटक हरिहरेश्वर येथील समुद्रात पोहण्यासाठी गेले होते. पोहण्यासाठी गेलेल्या मनिषा मेटेदळे सेल्फी काढताना अचानक मोठी लाट आली. यावेळी लाटेमुळे त्या समुद्रात बुडू लागल्या. त्यांना वाचवण्यासाठी विकास काळे यांनी पाण्याचा अंदाज न घेता समुद्रात उडी मारली. समुद्राची भरतीची वेळ असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने खोल समुद्रात दोघेही बुडाले.

पाण्यात बुडालेल्या दोघांपैकी मनिषा जयेश मेटेदळे यांना प्रशासनाच्या व साळुंके रेस्क्यू टीमच्या प्रयत्नाने वाचवण्यात यश आले आहे. किनाऱ्यावरून तातडीने काही मिनिटात हरिहरेश्वर गाठून या महिलेचे प्राण वाचवले आहेत. मात्र विकास रामचंद्र काळे यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने पर्यटकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT