कोकण

कारिवडेत कचरा प्रकल्पाला विरोध 

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी - कारिवडे भैरववाडी येथे सावंतवाडी पालिकेतर्फे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. याबाबत ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायतीला विश्‍वासात न घेता हा प्रकल्प सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे; मात्र स्थानिक लोकांना होणारा त्रास आणि संभाव्य साथ रोग लक्षात घेता हा प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी आज कारिवडे येथील ग्रामस्थांच्या वतीने प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे केली आहे. 

दरम्यान, कचरा प्रकल्पाच्या विरोधात सक्षम न्यायालयात दावा सुरू असताना ग्रामपंचायतची परवानगी न घेता त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. त्यामुळे हे काम तत्काळ बंद करावे आणि प्रकल्प रद्द करण्यात यावा यासाठी 7 एप्रिलला प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा देण्यात आला आहे. 

कारिवडे येथील माजी जिल्हा परिषद सभापती मंगेश तळवणेकर पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली आज ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आज श्री. इनामदार यांची भेट घेतली. या वेळी पंचायत समिती सदस्या प्राजक्ता केळुसकर, सरपंच तानाजी साईल, अशोक माळकर, नरेश राणे, केशव साईल, राजेंद्र पवार, तुकाराम आमुणेकर, सुरेश माळकर, लक्ष्मण गावकर, आनंद तळवणेकर आदी उपस्थित होते. 

या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले की, येथील पालिकेच्या वतीने कारिवड्यात कचरा प्रक्रिया उद्योग प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. त्या विरोधात कारिवडे ग्रामपंचायत कोकण आयुक्ताकडे गेली आहे. त्याबाबत त्या ठिकाणी दावा सुरू आहे. असे असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतीही परवानगी न घेता पालिकेकडून त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू केले आहे. तसेच कचरा टाकण्यासाठी खड्डे खोदण्यास सुरवात करण्यात आली आहे. हा प्रकल्प सुरू झाल्याच त्या ठिकाणी राहणाऱ्या भोगटेनगर शिक्षक कॉलनी, राणे कॉलनी आदी भागातील लोकांना याचा त्रास होणार आहे. पिण्याचे पाणी दुषित होणार आहे. तसेच बाजूला असलेले लघुधरणातील पाणी खराब होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पालिका प्रशासनाकडून रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 

याबाबत श्री. इनामदार म्हणाले, ""ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेले निवेदन आपण स्वीकारले असनू ते पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येणार आहे.'' 

शहराची घाण गावात नको 
याबाबत श्री. तळवणेकर म्हणाले, ""आमच्या गावातील लोकांचे आरोग्य चांगले राहणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रकारचा प्रकल्प आमच्या गावाच्या माथ्यावर मारून शहरातील घाण आमच्या गावात आणून कोणी टाकू नये या विरोधात आमचा लढा कायम सुरू राहणार आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT