Opposition to move out of Multispeciality Hospital Sawantwadi 
कोकण

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडी बाहेर नेण्यास `यांचा` विरोध

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंजूर केलेले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल शहराबाहेर गेल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करण्याचा एकमुखी निर्णय आज तालुका व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक संघाच्या आज संयुक्तिक बैठकीत घेण्यात आल्याचे व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी सांगितले. 

एकूणच शहरातील हॉस्पिटल शहराबाहेर जात असल्याने याला आता विविध संघटनेच्या माध्यमातून विरोध होत आहे. नगराध्यक्ष संजू परब यांनी हॉस्पिटल शहरातच उभारले जावे, अशी मागणी केली आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेली जागा पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ, असे स्पष्ट केले होते.

एकूणच शहराबाहेर जाणाऱ्या या हॉस्पिटलसाठी विरोध होत असताना आता यामध्ये शहरातील व्यापारी बांधव, उद्योजक, व्यावसायिकांनीही उडी घेतली असून, आज झालेल्या त्यांच्या संयुक्तिक बैठकीमध्ये हॉस्पिटल शहराबाहेर गेल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र विरोध दर्शवू, असा निर्णय घेण्यात आला. बैठकीला व्यापारी संघाचे जगदीश मांजरेकर, उपाध्यक्ष सुमंगल कालेलकर, बाळ बोर्डेकर, हेमंत मुंज, अभय पंडित, आसिफ बिजली, दत्ताराम सावंत, संदेश परब, वल्लभ नेवगी, श्रीपाद चोडणकर आदी उपस्थित होते. 

याबाबत माहिती देताना मांजरेकर म्हणाले, ""आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीसाठी मंजूर करून आणलेले व भूमिपूजन केलेले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल शहराबाहेर गेल्यास शहरावर एक प्रकारे अन्याय होण्यासारखा आहे. त्यामुळे शहरासाठी मंजूर झालेले हॉस्पिटल शहरातच होणे गरजेचे आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lucknow Fire : लोक जळत होते, खिडकी फोडली अन् पाईपच्या साहाय्याने खाली उतरली... लखनऊ आगीतील युवतीची वेदनादायक कहाणी

Arabian Sea Monsoon : मॉन्सूनचे जोरदार आगमन!, मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकात पावसाला सुरूवात; दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार

Lalan Singh: सहारनपूरच्या जंगलात मध्यरात्री सुरू झाला गोळीबार... पोलिसांनी ओळखला तोच कुख्यात ललन सिंह; काही मिनिटांत संपली वर्षांची दहशत

Latest Marathi News Live Update : वैजापूर तालुक्यातील तलवाडा घाटात ढगफुटीसदृश पाऊस; शिऊर बंगला-नांदगाव मार्गावरील पूल गेला वाहून

Ahilyanagar Crime: मित्रा कशाला वाद घालतो, भांडणात मध्यस्थीला गेला; ३२ वर्षीय तरुणाला १६ वर्षांच्या मुलानं संपवलं

SCROLL FOR NEXT