Pachal village is the first village in the taluka to quarantine the entire village by itself ... 
कोकण

रत्नागिरीतील या गावाने करुन घेतले स्वतःहून क्वारंटाईन : या गावाचे होत आहे कौतुक....

सकाऴ वृत्तसेवा

 राजापूर (रत्नागिरी) : लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली स्वतःहून संपूर्ण गावाला क्वारंटाईन करणारे तालुक्यातील पहिले गाव ठरलेल्या पाचल गावाने कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचे प्रांताधिकारी प्रविण खाडे यांनी कौतुक केले.

कोरोनाला रोखण्यासाठी भविष्यात त्यामध्ये सातत्य राखून तालुका सेफ झोनमध्ये ठेवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
गत बुधवारी पाचल ग्रामपंचायतीने व्यापार्‍यांच्या सहकार्याने बाजारपेठ बंद ठेवून जनता कर्फ्यु पाळला होता. त्यानंतर, प्रांताधिकारी श्री. खाडे यांनी पाचल ग्रामपंचायतीला भेट देवून ग्रामपंचायतीसह व्यापार्‍यांशी संवाद साधला.

यावेळी तहसिलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी सागर पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय साबळे, पोलिस निरिक्षक जनार्दन परबकर, पोलिस उपनिरिक्षक हितेंद्र चव्हाण, पाचलच्या सरपंच अपेक्षा मायसे, उपसरपंच किशोर नारकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी अर्जुन नागरगोजे उपस्थित होते.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन घोषित करून संचारबंदी लागू केली होती. यावेळी पाचल ग्रामपंचायतीने स्वतःहून पुढाकार घेत पाचल गाव क्वारंटाईन केला. अशाप्रकारे स्वतःहून गाव क्वारंटाईन करणारे पाचल गाव तालुक्यातील पहिले ठरले. त्यामध्ये अत्यावश्यक सुविधा वगळता बाजारपेठेतील अन्य दुकाने बंद ठेवली.

सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांच्या साथीने लोकांना घरपोच सेवा-सुविधा देण्यावर त्यांनी भर दिला. गत बुधवारी व्यापार्‍यांच्या सहकार्याने बाजारपेठ बंद ठेवून जनता कर्फ्युही पाळला. पाचल ग्रामपंचायतीने ग्रामस्थ, व्यापारी यांच्या सहकार्याने राबविलेल्या या उपक्रमाचे श्री. खाडे यांनी कौतुक केले. भविष्यामध्ये मुंबईकर गावामध्ये येणार असून या काळामध्ये अधिक सजग राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी व्यापार्‍यांना सोशल डिस्टन्स, मास्क वापर आदींविषयी सूचनाही केल्या. यावेळी बोलताना सरपंच सौ. मासये यांनी जिल्ह्यातील लोकांची स्वॅब तपासणी जिल्ह्यामध्ये करण्याच्या अनुषंगाने शासनाने आरोग्य यंत्रणा उभारावी अशी मागणी केली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शंकर पाथरे, सिद्धार्थ जाधव, आत्माराम सुतार, विनायक सक्रे, पोलिस पाटील रविंद्र खानविलकर, व्यापारी प्रतिनिधी बाळा सावंत, विवेक सक्रे, दिलीप देवरूखकर, मंडल अधिकारी गजानन राईन, आरोग्य सेवक सचिन झोरे आदी उपस्थित होते. यावेळी आभार ग्रामविकास अधिकारी श्री. नागरगोजे यांनी मानले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

Latest Maharashtra News Updates : धुळे बाजार समितीच्या आवारात घाणीचे साम्राज्य

Air Force Recruitment 2025 : बारावी पास विद्यार्थ्यांसाठी हवाई दलात सामील होण्याची ‘सुवर्ण संधी’ !

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

SCROLL FOR NEXT