Palghar beach fisher found flayer fish bird 
कोकण

वाढवण समुद्रकिनारी सापडला हवेत उडणारा पाखरू मासा

सकाळ वृत्तसेवा

पालघर : वाढवण समुद्रकिनारी नुकताच हवेत उडणारा पाखरू मासा सापडल्याने सध्या त्याचीच चर्चा रंगली आहे. अतिदुर्मिळ असा हा मासा पाहण्यासाठी समुद्रकिनारी गर्दी होत आहे. त्यांच्या काही जाती भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम किनाऱ्यांजवळ आढळून येतात; पण डहाणू व पालघरमध्ये ते आढळल्याची नोंद यापूर्वी झालेली नाही. म्हणूनच त्याच्याबाबतची उत्सुकता वाढू लागली आहे. 


पाखरू मासा पंखाच्या साहाय्याने पाण्याबाहेर काही वेळ तरंगू शकतो; परंतु तो पक्ष्याप्रमाणे उडू शकत नाही. अस्थिमत्स्य वर्गाच्या बेलॉनिफॉर्मिस गणाच्या एक्‍झॉसिटिडी कुळात त्याचा समावेश होतो. जगभर त्यांच्या ९ प्रजाती व ६४ जाती आहेत. सर्व उष्ण प्रदेशातील समुद्रात ते आढळतात; पण वाढवण समुद्रकिनारी तो प्रथमच आढळला, असे स्थानिक जाणकार सांगतात. ज्यांच्या गळाला "पाखरू'' लागला ते प्रमोद दळवी यांनीही असा मासा कधी सापडला नसल्याचे सांगितले. माशाच्या काही जाती भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम किनाऱ्यांजवळ आढळून येतात.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Opening Ceremony: आयपीएलचा उद्घाटन सोहळा होणार नाही, 'त्या' ११ जणांसाठी घेतला निर्णय; निरोप समारंभ मात्र दणक्यात...

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवड मध्ये स्पा सेंटरवर कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल

'ट्रम्पजी, मला LPG सिलिंडर पाठवा!' बोमन ईरानींची व्हिडिओद्वारे ट्रम्प यांच्याकडे मागणी, म्हणाले,'कस्टर्ड, धनसक खाऊ घालतो पण...'

Income Tax Alert: 31 मार्चपूर्वी ही 4 कामे नक्की करा! नाहीतर करसवलतही नाही वर मोठा दंड आणि व्याजही भरावे लागेल

Pimpri Chinchwad News: ‘भामा आसखेड’बाबत दिरंगाई नको; पिंपरी महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी!

SCROLL FOR NEXT