pali
pali 
कोकण

पाली - इको फ्रेंडली कापडी मखरांना पसंती

अमित गवळे

पाली - गणपती सणाला काही दिवस शिल्लक आहेत. गणपतीची आरास, मखर व सजावटीचे साहित्याने बाजार सजले आहेत. मात्र काही सजग व पर्यावरणप्रेमी कलाकार व कारागिरांनी इको फ्रेंडली कापडी मखर बनविले आहेत. प्लास्टिक मुक्तिसाठी हे पर्यावरण स्नेही मखर खुपच सहाय्यक ठरत आहेत. 

प्लास्टिक व थर्मोकोल बंदीच्या निर्णयामुळे इकोफ्रेंडली वस्तुंना मागणी वाढली आहे. गोरेगाव मध्ये राहणारे विलास डेकोरेटर्सचे मालक विलास शिंदे यांनी थर्माकोलच्या मखरांना पर्याय देण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी अत्यल्प नफा कमावून कापडी मखर बनविने व विक्री व्यवसाय सुरु केला. त्यांनी मागील वर्षापासून कापडी मखर बनविण्यास सुरुवात केली. हे मखर अगदी सिंधुदुर्ग, रत्नागिरी व खेड मधील लोकांनी सुद्धा विकत नेले. यंदा शिंदे यांनी जवळपास 200 कापडी मखर बनविले असून निम्म्या हुन अधिक कापडी मखरांची बुकिंग झाली आहे. सोलापूरमधील काही लोकांनी शिंदे यांचे मखर विकत नेले आहेत. गोरेगाव, महाड आणि माणगाव आदि ठिकाणी त्यांनी कापडी मखर प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवले आहेत. कापडी मखर हे पर्यावरण स्नेही, थर्माकोलच्या मखरांपेक्षा स्वस्त, टिकाऊ आणि हाताळण्यास सुलभ असल्याने या मखरांना मागणी वाढली असल्याचे विलास शिंदे यांनी सकाळला सांगितले. 

कापडी मखर 3×3, 4×5 आणि 5×6 या साईजमध्ये उपयुक्त आहेत. याची किंमत अनुक्रमे 1800, 2200 ते 2800 इतकी आहे. कापडाच्या दर्जावरून मखराची किंमत ठरते. शिवाय ते सहज दुमडून कोठेही ठेवता येते, धुता येते व अनेक वेळा वापरता देखील येते. आणि आकर्षक देखील आहे. 

या पाठीमागे नफा मिळविणे हा हेतु नाही. पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी हे पाऊल उचलले आहे. यास लोकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विलास शिंदे, मालक विलास डेकोरेटर्स व कापडी मखर निर्माते, गोरेगाव-रायगड

हे कापडी मखर अतिशय सुंदर व दर्जेदार आहेत. पर्यावरण जागृतिसाठी केलेला हा प्रयत्न प्रभावी आहे. लोकांनी हे मखर खरेदी केले पाहिजेत.
शलाका केदार गांधी, ग्राहक, माणगाव
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT