Parashuram Upkar
Parashuram Upkar Esakal
कोकण

हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे विरोधकांना पोटशूळ; परशुराम उपरकर

सकाळ डिजिटल टीम

कणकवली: सत्ताधारी शिवसेना पक्ष आता हिंदुत्ववाद सोडून सेक्युलर झाला आहे. बाळासाहेबांच्या जुन्या भाषणांचे व्हिडिओ पाहिले तर त्यातून प्रखर हिंदुत्वाचे दर्शन घडते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पाडवा मेळावा आणि ठाण्यातील मेळाव्यामुळे सत्ताधारी राजकीय पक्ष घाबरले आहेत. त्यामुळे विविध आरोप होत आहेत; मात्र मराठी माणूस आणि हिंदुत्वासासाठी मनसेची (MNS) स्थापना करण्यात आली होती. राज ठाकरे यांनी आपला हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावीपणे पुढे केल्यामुळे इतर पक्षांच्या पोटात पोटशूळ उठला आहे, अशी टीका मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर (Parshuram Upkar) यांनी केली आहे. येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपरकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते.

उपरकर म्हणाले, "राज ठाकरे यांनी हनुमान जयंतीच्या औचित्यावर अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. त्यामुळे बाकीचे राजकीय पक्ष मंदिरात जाऊन आपल्या हिंदुत्वाचे दर्शन घडवत आहेत. ज्या पक्षाची स्थापना खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादासाठी करण्यात आली होती, तो सत्ताधारी शिवसेना पक्ष आता हिंदुत्ववाद सोडून सेक्युलर झाला आहे. बाळासाहेबांच्या जुन्या भाषणांचे व्हिडिओ पाहिले तर त्यातून प्रखर हिंदुत्वाचे दर्शन घडते. बाळासाहेबांचे शरद पवारांशी सलोख्याचे संबंध असले तरी त्यांना बाळासाहेबांनी अनेकदा व्यासपीठावरून सुनावले होते. इटलीहून लग्न करून भारतात आलेल्या सोनिया गांधींना पांढऱ्या पायाची म्हणणारे बाळासाहेबच होते. आज एकत्रित सत्तेत आल्यामुळे सरकार सेक्युलर झाले आहे.

अल्पसंख्यांक मंत्र्यांनी मुस्लिम मुलांना शिक्षणासाठी तीन हजार रुपये मासिक मानधन घोषित केले; मात्र इतर धर्मीय मुलं गरीब असूनही त्यांना मानधन दिले जात नाही. हज यात्रेला विमान प्रवासासाठी सवलत दिली जाते; मात्र सर्व हिंदूंना पंढरपूरला जाण्यासाठी एसटीची किंवा इतर प्रवासाची सवलत सरकारने दिली नाही. त्यामुळे एका हिंदुत्ववादी पक्षाने हिंदुत्वाची कास सोडल्यामुळे राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा विषय जो बाळासाहेबांनी उचलून ठरला होता त्याचे समर्थन केल्याने इतरांना डोकेदुखी झाली आहे. राज ठाकरे हे हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी बाळासाहेबांची जुनी भाषणे ऐकवीत किंवा आम्ही ती त्यांना देतो. त्यावेळी बाळासाहेबांनीही दसरा मेळाव्यात भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. तत्कालीन नेते सरपोतदार यांनी भोंग्यांविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती.

बाळासाहेबांनी रस्त्यावर पडल्या जाणाऱ्या नमाजांविरोधात शिवसैनिकांना आदेश दिले होते की महाआरती करायची. याबाबत खासदार अज्ञान आहेत का? आज भारतात प्रखर हिंदुत्ववादी बोलणारा जहाल नेता म्हणून राज ठाकरे लोकांना हवे आहेत. त्यामुळे बाकीच्या पक्षांच्या पोटात पोटशूळ आले आहेत. त्यामुळे आता हिंदुत्ववादी नेता म्हणून राज ठाकरेंकडे बघण्याची गरज आहे. आता मुख्यमंत्री आणि त्यांच्या बांडगुळांनी बाळासाहेबांचे विचार समजून घेण्याची गरज आहे. राज ठाकरेंच्या 5 जूनच्या अयोध्या दौऱ्याला जिल्ह्यातूनही शेकडो मनसैनिक सहभागी होणार आहेत."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT