रत्नागिरी : जातीच्या दाखल्यांचा भार पेलता पेलेना sakal
कोकण

रत्नागिरी : जातीच्या दाखल्यांचा भार पेलता पेलेना

रिक्त पदांमुळे अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ ; २0३४ प्रलंबित प्रकरणे

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : समाजकल्याण विभागाच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीवर सध्या प्रचंड ताण आहे. शासनाच्या मंजूर १० पदांपैकी ७ पदे रिक्त आहेत तर कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आलेल्या ९ पदांपैकी ५ पदे रिक्त आहेत. समितीच्या मुख्य तिन्ही अधिकाऱ्यांवर अतिरिक्त भार असल्याने जातपडताळी प्रमाणपत्रांचा निपटारा करताना या अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे जातपडताळणी प्रमाणपत्राची महिनाअखेर प्रलंबित प्रकरणे २ हजार ३४ आहेत.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी आठ वाजल्यापासून या कार्यालयाचा कारभार सुरू करण्याची वेळ या अधिकाऱ्यांवर आली आहे. शासनाने याची दखल घेऊन रिक्त पदे भरण्याची गरज आहे. कोरोना महामारीमुळे गेली दीड वर्षे कार्यालये बंद असल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित होती. मात्र या कार्यालयाचे वेगळेच दुखणे पुढे आले आहे. शैक्षणिक, सेवाअंतर्गत, सेवापूर्व, निवडणूक, इतर जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी या समितीकडे आहेत. या कार्यालयाला समिती अध्यक्ष, सदस्य सचिव, स्टेनो, सीनिअर लिपिक, ज्युनिअर लिपिक, शिपाई, डीवायएसपी, पोलिस निरीक्षक अशी १० पदे मंजूर असून फक्त 3 अधिकारीच कार्यरत आहेत. उर्वरित ७ पदे रिक्त आहेत. अध्यक्षांकडे सात जिल्ह्यांचा कार्यभार आहे. चेअरमन, सदस्य सचिव यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहेत. मनुष्यबळ वाढवण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर ९ पदे भरण्यात आली आहेत; मात्र त्यापैकी चार कर्मचारी हजर असून उर्वरित ५ पदे रिक्त आहे. स्थानिक मंत्री, आमदार आणि शासनाने याची दखल घेऊन रिक्त पदांचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.

असा झालाय निपटारा

कोरोनानंतर दीड ते दोन वर्षांनी शैक्षणिक वर्षे सुरू झाली आहेत. त्यासाठी लागणारे जात पडताळणी प्रमाणपत्रांची संख्या सर्वांत जास्त आहे. गेल्या महिन्यासह चालू महिन्यातील एकूण प्रकरणे १ हजार ८६९ आहेत. त्यामध्ये वैध प्रकरणे ३८९ आहे. तेवढी सर्व निकाली काढण्यात आली आहेत. दाखल झालेल्या एकूण २ हजार ४४५ प्रकरणांपैकी ४११ प्रकरणे निकाली काढण्यात आली तर २ हजार ३४ प्रकरणे अजून प्रलंबित आहेत.

  • शैक्षणिक १८६९ तर निकाली ३८९

  • सेवा प्रकरणे २३७, निकाली १७

  • निवडणुकीची प्रकरणे ३३९, निकाली ५

  • अतिरिक्त पदभाराचा बसतोय फटका

"कार्यालयात रिक्त पदांचा गंभीर विषय आहे. कामावर त्याचा विपरित परिणाम होत असून प्रकरणे निकाली काढताना नाकीनऊ येत आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही सकाळी ८ वाजल्यापासून कामकाजाला सुरवात केली तरी कामाचा प्रचंड ताण आहे."

- संतोष चिकने , जातपडताळणी समिती सचिव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant: निवृत्तीच्या आधी न्यायाधीशांनी नेमकं काय केलं? CJI सूर्यकांत यांनी व्यक्त केली चिंता, न्यायव्यवस्थेतही भ्रष्टाचार?

Gold Rate Today : सोन्याच्या भावात ऐतिहासिक उसळी, चांदीनेही मोडला विक्रम, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Ashes Test: नॅथन लायनमुळे चिडला Glenn McGrath; हात वर केले, फेकायला खूर्ची उचलली अन्... Video Viral

Code of Conduct : आचारसंहितेबाबत आयुक्तांचा इशारा; उल्लंघन केल्यास तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Delhi Pollution Restrictions : दिल्लीत आजपासून कडक निर्बंध, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, PUC शिवाय पेट्रोल मिळणार नाही

SCROLL FOR NEXT