people and shopkeepers facing issue due to rains in pali
people and shopkeepers facing issue due to rains in pali 
कोकण

परतीच्या पावसाने दिवाळीच्या आनंदावर पाणी, व्यावसायाईक चिंतेत आणि बळीराजा हातश

अमित गवळे

पाली : ऐन दिवाळीत जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये मात्र सुकसूकाट आहे. कारण मागील काही दिवसांपासून परतीच्या पावासाने जिल्ह्यात सर्वत्र धुडगूस घातला आहे. पावसामुळे ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत. तसेच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे देखिल नुकसान झाले आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांच्या हाती पैसा नाही. परतीच्या पावसाने दिवाळी सणावर पाणी सोडले आहे. परिणामी व्यावसाईक चितेंत तर बळीराजा हताश आहे.

विधानसभा निवडणूकीच्या काळात कार्यकर्ते व सरकारी कर्मचारी व शिक्षक कामात होते. त्यामुळे खरेदीसाठी कोणी बाहेर पडले नाही. मागील काही दिवसांपासून परतीचा पाऊस व ढगाळ वातावरण आहे. अशा वेळी दिवाळीच्या खरेदीसाठी लोक बाहेर पडत नाहीत. व्यापारी व दुकानदारांनी दिवाळीचा लाखो रुपयांचा माल भरुन ठेवला आहे. परंतू ग्राहक नसल्याने ऐन दिवाळीत वस्तुंना उठाव नाही. त्यामुळे व्यवासयिक व व्यापारी पुरते हवालदिल झाले आहेत. अजुन शेतकर्याचे धान्य शेतात आहे. सुगीच्या दिवसांना अजून सुरुवात झालेली नाही. त्यात परतीच्या पवासाने भाताचे (पिकांचे) पुरते नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसा नाही तो धास्तीत आणि हताश आहे. महिना अखेर दिवाळी आली असल्याने अनेकांचा हिशोब आणि टाळेबंद बिघडला आहे. आकाश कंदिल, इलेक्ट्रिक वस्तू आदिंचे भाव वाढले आहेत. तसेच आकाश कंदिल, इलेक्ट्रिक वस्तू व फटाके अतिशय जपून ठेवावे लागत आहे. या वस्तू प्रदर्शनासाठी दुकानाबाहेर देखिल ठेवता येत नाहीत. पाऊस असल्याने विद्युत रोषणाई व आकाश कंदिल कुठे लावावे, रांगोळी कुठे काढावी, फटाके कुठे फोडावेत हे प्रश्न पडले असल्याने दिवाळीच्या सणावर आणि आनंदावर विरजण पडले आहे.

आकाश कंदिल, लाईटिंग ब दिव्यांच्या किंमतीमध्ये वीस ते तीस टक्क्यांनी वाढ
मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी आकाश कंदील, इलेक्ट्रिक वस्तू आणि लाईटिंग दिव्यांच्या किंमतीमध्ये वीस ते तीस टक्यांनी वाढ झाली आहे. बाजारात खरेदीसाठी येणारा ग्राहक वस्तुंचा भाव कमी करुन मागतो. उदा. मागील वर्षी शंभर रुपये असलेला आकाश कंदील आता एकशे वीस ते एकशे तीस रुपयांना मिळतो. ग्राहक हा कंदील शंभर रुपयांनी मागतात परंतू भाव कमी करुन देणे दुकानदारास परवडत नाही. पालीतील मुकूंद कोसूमकर या दुकानदाराने सांगितले की, 'पावसामुळे एकतर ग्राहक येत नाहीत आणि वाढीव किंमतीमुळे वस्तू विकल्या जात नाहीत. आहे तो माल घाट्यात विकावा लागत आहे.'

फटाके, कपडे यांची दुकाने देखील ओस
सततच्या पावसामुळे फटाक्यांचा माल खराब होत आहे. फटाके देखील बाहेर ठेवता येत नाहीत. धंद्यावरही परिणाम झाला आहे. दिवाळीपेक्षा निवडणूकीत जास्त फटाके विक्री झाली. असे सचिन खिवंसरा या फटाके विक्रेत्याने सांगितले. तसेच पणत्या, दिवे व रांगोळी विक्रेत्यांना देखिल पावसाचा फटका बसला आहे. मातीचे दिवे किंवा पणत्या तर पावसामुळे ओल्या होऊन खराब होत आहेत. तर कपडे विक्रेतेसुद्धा पावसामुळे ग्राहक न आल्याने मेटाकूटीला आले आहेत. पावासामुळे खरेदीसाठी लोक बाहेर पडत नाहीत असे चंद्रशेखर पारंगे या व्यावसाईकाने सांगितले.

बच्चे कंपनीचा हिरमोड
दिवाळीत बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मशगुल असते. परंतू सततच्या पावसाने मुलांना किल्ले बनविता येत नाहीत. ज्यांनी किल्ले तयार केले आहेत. त्यांचे किल्ले सुद्धा पावसामुळे खराब झाले किंवा तुटले आहेत. पावसामुळे फटाके फोडता येऊ शकत नाही. घराबाहेर हौशीने आकाश कंदील व पणत्या लावता येत नसल्याने हिरमोड झाला आहे. असे यज्ञा सुर्वे या लहानगीने सांगितले.

पाऊस आणि दिवाळीचे मेसेज फेसबुक, व्हॉट्सअपवर व्हायरल !
ऐन दिवाळीत पाऊस धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे लोकांची कशी फजिती आणि दैना उडत आहे. पावसामुळे काय काय परिणामांना सामोरे जावे लागत आहे. याचे लज्जतदार मेसेज फेसबुक आणि व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहेत.

'परतीच्या पावसामुळे लोक खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत. त्यामुळे बाजारपेठांमध्ये सुकसूकाट आहे. यावर्षी मात्र पावसामुळे दिवाळीच्या तोंडावर देखील ग्राहक खरेदीसाठी येत नाहीत. दुकानाबाहेर विक्रिसाठी सुद्धा फटाके ठेवता येत नाही. मागीलवर्षी पेक्षा या वर्षी फटाके विक्रीत ५० टक्यांनी घट झाली आहे. व्यवसायावर परिणाम झाला आहे', दिनेश शहा या फटाके विक्रेतांनी असं मत व्यक्त केलं आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT