people arrived without e pass in ratnagiri from mumbai 
कोकण

एक हजार रुपये भाड्यासाठी तो घेवून आला दोन महिलांना ; अन् 'त्या' निघाल्या कोरोना पॉझिटीव्ह...

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - पॉझिटीव्ह रुग्ण महिलांना रत्नागिरीत आणून सोडणार्‍या आंबा वाहतूक करणार्‍या टेम्पो चालकाचा शोध लावण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले. तो टेम्पो चालक कुवारबाव येथील असून त्या महिलांना आणण्यात आणखी एकाने सहकार्य केले होते. या प्रकरणी पॉझिटिव्ह महिलांसह त्या दोघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्या दोघांनाही संस्थत्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.

संशयित प्रकरणाचा पाठपुरावा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. टाळेबंदी जाहीर केली असून जिल्ह्याच्या सिमा बंद केल्या आहेत. आंतरजिल्हा वाहतूकीसाठी ई-पासची व्यवस्था केली गेली आहे. तसेच जीवनावश्यक वस्तुंना वाहतुकीसाठी मुभा दिली आहे. असे असतानाही मुंबईतील अनेकजण ई- पास नसतानाही चाकरमान्यांना रत्नागिरीत आणून सोडत आहेत. त्यांना रोखण्यासाठी प्रशासनाने दंड थोपटले होते. विशेषतः आंबा वाहतूक करणारे हा प्रताप करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ.  प्रवीण मुंढे यांनी सर्व पोलीस निरीक्षक यांना कडक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी अशा संशयित प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.

एक हजार रुपये भाड्यासाठी त्याने हा प्रताप

वडाळा मुंबई येथून दोन महिला एका टेम्पोतून 8 मे रोजी रत्नागिरी माळनाका येथे आल्या होत्या. मुंबईतून आल्यामुळे स्वतःच त्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांचे मुळ गाव कर्ला आणि सोमेश्वर अशी आहेत. त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांचे नमुने कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यांच्या संपर्कात आलेल्या टेम्पो चालकाचा शोध सुरु झाला. याबाबत त्या महिलांचे सुरुवातीला सहकार्य मिळाले नाही. मात्र दोन दिवसांनी तो टेम्पो कुवारबावचा असल्याची माहिती चौकशीतून पुढे आली. टेम्पो चालक कृष्णा विराप्पा सुरणकर (रा. गराटेवाडी, कुवारबाव) आणि त्या महिलांना आणण्यासाठी सहकार्य करणारा रफिक मुल्ला (रा. एमआयडीसी) या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या या प्रकारामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आणि संचारबंदी आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सुरणकर हा मुुंबईतून आंबे वाहतूक करतो. एक हजार रुपये भाड्यासाठी त्याने हा प्रताप केल्याचे पुढे आले आहे. पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक श्री. कदम यांनी सांगितले.

प्रवासाची माहिती पोलिसांपासून लपवली

दुसर्‍या प्रकरणात मुंबई विलेपार्ले येथून एक महिला देवूड येथे आली होती. तिने आपल्या प्रवासाची माहिती पोलिसांपासून लपवून ठेवली. तसेच नातेवाईकांच्या गाडीतून आल्याचे पोलिसांना सांगितले. रेडझोनमधून आल्यामुळे त्या महिलेला संस्थात्मक क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे. ती महिला आलेल्या गाडीचा तपास सुरु होता. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यातर्फे या प्रकरणाचा तपास सुुरु होता. त्या चालकाचा तपास लागला असून या प्रकरणी आंबे वाहून नेणारा विनय दत्तराम खेडेकर (रा. गुरुमाऊली, तरवळ, ता. रत्नागिरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार; हरी गंगावणे यांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

Tukaram Mundhe:तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांमधील भरमसाठ बिलांचा पर्दाफाश तुमची कशी होतेय लूट?

SCROLL FOR NEXT