police fight corona ratnagiri
police fight corona ratnagiri 
कोकण

कोरोनाशी लढता-लढता घरापासून दुरावा; कुटुंबात जाताना मनात धास्ती

राजेश शेळके

रत्नागिरी - देशासह महाराष्ट्र आणि जिल्हा कोरोनाचा सामना धिटपणाने करीत आहे. यामध्ये सर्वांत जास्त भरडला जात आहे तो पोलिस. पोलिस अधिकारी, कर्मचारी घरच्यांपासून दुरावत असल्याची धक्कादायक बाब पुढे येत आहे. ड्युटी बजावल्यानंतर घरात जाताना आमच्या पोटात भितीचा गोळा येतो. पत्नी, मुलांजवळ जाऊ की नको, अशी धास्ती असते. ही व्यथा सोशल मीडियावर अनेक पोलिस कर्मचार्‍यांनी मांडली. मात्र कर्त्यव्याबाबत ते ठाम आहेत.  


संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 21 दिवसाचा लॉकडाऊन सुरू आहे. त्यानंतर संचारबंदीही लागू केली आहे. मात्र लोकांच्या ते गळी उतरविताना पोलिसांची दमछा होत आहे. घरात राहाल सुरक्षित राहा, घरातून बाहेर पडू नका, अशा अनेक सूचना पोलिस देत आहेत. मात्र लोक ती नजरेआड करून पुन्हा रस्त्यावर येत आहेत. संचारबंदीचा भंग होत असल्याने पोलिसांची ड्युटी आता 8 तास नव्हे; तर 12 आणि 24 तास झाली आहे. बंदोबस्त करता करता अनेक अडचणी त्यांना येत आहेत. सर्व बंद असल्याने जेवण राहुद्या, पाणी मिळणे मुश्कील होते. समाजिकी संस्था किंवा संघटना त्यांना जेवण देतात. ड्युटी करताना कोरोना बाधित भागात कोणाशी कधी कसा संपर्क येईल याची माहिती नाही. नेहमी थकलेला भागलेला बाबा घरात आला की बिलगणारी मुल जवळ आली तरी मन धजावत नाही. कुटुंबातील सदस्यांपासून अंतर ठेऊनच राहावे लागत आहे. ड्युटी संपून घरात जाऊ की नको, अशी मानसिकता होते. सोशल मीडियावर पोलिसांनी मन हेलावणारे अनेक प्रसंग टाकले आहेत. आता जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी देखील उघड बोलत आहेत. आम्ही घरी जाऊ की नको, अशी भिती सतत त्यांच्या मनात आहे.

संचारबंदी आदेशाचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी आम्ही दिवस रात्र रस्त्यावर बंदोबस्ताला आहोत. या दरम्यान अनेक लोक आमच्या संपर्कात येतात. कोण कोठून आला माहित नाही. त्यामुळे ड्युटी संपल्यानंतर कुटुंबात मिसळताना मनात प्रचंड भिती वाटते. आज सर्व पोलिस कर्मचार्‍यांची ही परिस्थिती आहे. तरीही कर्त्यव्याला बगल देऊ शकत नाही.


-अनिल विभुते, जिल्हा वाहतूक पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Latest Marathi News Update : करकरेंविषयी वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा; शशी थरूरांची मागणी

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT